---Advertisement---

“सुवर्णपदक जिंकले त्या दिवसापासून ते पदक मी माझ्या खिशात घेऊन फिरत आहे” – नीरज चोप्रा

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 1:01 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. सोमवारी(९ ऑगस्ट) पदक विजेत्या खेळाडूंचे दिल्ली विमानतळावर भव्य असे स्वागत करण्यात आले. येथून पदक विजेते खेळाडू थेट अशोका हॉटेलमध्ये गेले. जिथे त्यांना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सन्मानित केले आहे. या सत्कार समारंभात सर्वांच्या नजरा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रावर होत्या आणि जेव्हा तो स्टेजवर आला, तेव्हा त्याने टोकियोबद्दल काही मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.

नीरज चोप्रा मंचावर आला आणि त्याने प्रथम आपले पदक दाखवले आणि सांगितले की, ‘जेव्हा पासून मी पदक जिंकले आहे त्या दिवसापासून मी माझ्या खिशात पदक घेऊन फिरत आहे. मला आजही त्याला दाखवायचे आहे. हे माझे पदक नाही, हे संपूर्ण देशाचे पदक आहे. तुमच्या समर्थनाबद्दल मनापासून धन्यवाद.’

पदकानंतर ना झोप लागली ना भूक
नीरज पुढे म्हणाला की, ‘ज्या दिवसापासून पदक मिळाले, त्या दिवसापासून मला भूक किंवा झोप लागली नाही.’ त्याचबरोबर अंतिम फेरीतील थ्रोवर नीरज म्हणाला की, ‘मला वाटले की ही माझी वैयक्तिक सर्वोत्तम फेक आहे. थ्रो नंतर मागे वळून बघायचे कारण नव्हते. मला वाटते की तुम्ही तुमचे १००% द्या आणि कोणालाही घाबरू नका.’

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘ही संध्याकाळ ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंची आहे. १३५ कोटी लोकांच्या वतीने मी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन करतो. नीरज चोप्रा, तू फक्त पदकच नव्हे तर हृदयही जिंकले आहे. आमचे खेळाडू पुढील ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करतील. आम्ही तुमच्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, सर्व काही तुम्हाला उत्तमोत्तम दिले जाणार आहे.’

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकली ७ पदके
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ७ पदके जिंकली आहेत. जी कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने ६ पदके जिंकली होती. यावेळी सुवर्ण पदकही भारताच्या खात्यात आले आहे. ज्यात नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सहभागी होता. नीरजच्या आधी अभिनव बिंद्राने २००८ मध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकले होते.

टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेते भारतीय
१) नीरज चोप्रा – सुवर्ण पदक (भालाफेक)
२) रवी दहिया – रौप्य पदक (कुस्ती)
३) मीराबाई चानू – रौप्य पदक (वेटलिफ्टिंग)
४) पीव्ही सिंधू – कांस्य पदक (बॅडमिंटन)
५) लवलीना बोरगोहेन – कांस्य पदक (बॉक्सिंग)
६) बजरंग पुनिया – कांस्य पदक (कुस्ती)
७) पुरुष हॉकी संघ – कांस्य पदक

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडचा २०१८ चा दौरा अपयशी ठरला, पण यंदा ‘हे’ ध्येय मनाशी पक्कं करुन आलोय, केएल राहुलने व्यक्त केला विश्वास

न्यूझीलंडचा दिग्गज अष्टपैलू मुख्य धमनी फुटल्यामुळे रुग्णालयात दाखल; देतोय मृत्यूशी झुंज

हाँगकाँगकडून २०१४ टी२० विश्वचषकात खेळलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार न्यूझीलंडकडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---