---Advertisement---

‘गोल्डन बॉय’ नीरजचा पुन्हा ‘गोल्डन थ्रो’! लुसेन डायमंड लीगमध्ये पिछाडीवरून पटकावले सुवर्णपदक

---Advertisement---

जवळपास दोन महिने दुखापतीमुळे मैदानापासून दूर राहिलेला भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुनरागमन करताना जबरदस्त कामगिरी केली. लुसेन डायमंड लीगमध्ये त्याने पिछाडीवरून पुढे निर्णायक कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले. यासह त्याने डायमंड लीगमधील आपले वर्ल्ड लीड कायम ठेवले आहे.

https://twitter.com/NikhilNaz/status/1674872590761074688?t=TcNk5FOEzP0xuVVKRUMxqg&s=19

 

दोहा डायमंड लीगमध्ये विजय मिळवल्यानंतर नीरज दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर युरोपमध्येच राहून त्याने आपल्या फिटनेसवर काम केले. या स्पर्धेत त्याची सुरुवात अत्यंत खराब झाली. नो मार्क थ्रो केल्याने त्याचा पहिला थ्रो अवैध ठरला. तर दुसऱ्या थ्रो मध्ये देखील 83 मीटर इतकीच मजल त्याला मारता आली. तिसऱ्या थ्रो मध्ये मात्र त्याने 85 मीटरचा आकडा पार केला. चौथ्या थ्रो मध्ये पुन्हा एकदा नो मार्क थ्रो त्याच्याकडून केला गेला.

पाचव्या संधीत मात्र त्याने सोनेरी कामगिरी केली. 87.66 मीटर इतकी फेक करून त्याने आघाडी मिळवली. तर अखेरच्या थ्रो मध्ये देखील 84 मीटरचा पल्ला त्याने गाठला. दुसऱ्या क्रमांकावर जर्मनीचा जुलियन वेबर राहिला. त्याने 87.03 अशी फेक केली.

सलग दोन स्पर्धांमध्ये आघाडी घेतल्याने नीरज सलग दुसऱ्यांना डायमंड लीग विजेतेपद पटकावण्याच्या अगदी जवळ आला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय बनू शकतो.

(Neeraj Chopra Wins Gold In Lusanne Diamond League)

महत्वाच्या बातम्या-
MPL मधून मिळाली महाराष्ट्राची ‘यंग ब्रिगेड’! भविष्यात ठोठावतील टीम इंडियाचे दार
अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---