पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. 140 कोटी भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन नीरज चोप्रा भालाफेक करण्यासाठी गुरुवारी (08 ऑगस्ट) मध्यरात्री मैदानात उतरला होता. मैदानी क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा यंदाच्या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा भारतीयांना होती. पण यावेळी त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा त्याला बचाव करता आला नाही, कारण यावेळी सुवर्णपदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे गेले आहे. नीरज चोप्रा हा सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र नदीमने सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिक विक्रम मोडून संपूर्ण जगाला चकित केले आहे. 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पाचवे पदक आहे, याआधी भारताने 4 कांस्यपदके जिंकली होती.
🇮🇳🥈 𝗦𝗘𝗡𝗦𝗔𝗧𝗜𝗢𝗡𝗔𝗟 𝗦𝗜𝗟𝗩𝗘𝗥! A terrific performance from Neeraj Chopra to win India’s first Silver medal at #Paris2024 .
👏 Many congratulations to him on this incredible achievement!
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲… pic.twitter.com/uKjeiKGnFP
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 8, 2024
नीरज चोप्राचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने 89.45 मीटर भालाफेक करून मोसमातील सर्वोत्तम थ्रो केला. यापूर्वी 2024 हंगामात, त्याची सर्वोत्तम थ्रो 89.34 मीटर होती, जी त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पात्रता फेरीत गाठली होती. नीरजला 6 प्रयत्न मिळाले, त्यापैकी पाच फाऊल राहिले. सुवर्णपदक न जिंकल्याची निराशा नीरजच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. असे असले तरी नीरजने भारतीय खेळाडू आणि तरुणांसाठी नवे मापदंड प्रस्थापित केले आहे.
हेही वाचा-
कुस्तीत भारताच्या पदरी पुन्हा निराशा, स्टार पैलवानाचा सेमीफायनलमध्ये पराभव
विनेशला पदक मिळणार की नाही? पॅरिसमध्ये होणार सुनावणी, कोर्टानं अपील स्वीकारलं
भारतीय संस्कार दाखवत श्रीजेशने जिंकली लाखो मने, विजयानंतर केलेली कृती चर्चेत