---Advertisement---

इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक

---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय आव्हानाच्या अखेरच्या दिवशी (शनिवारी, ७ ऑगस्ट) भारताचा अखेरचा ऍथलिट भालाफेकपटू नीरज चोप्रा सहभागी होत होता. सर्व भारतीयांना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. त्याने ही अपेक्षा पूर्ण करत भारताला ऑलिम्पिक इतिहासात ऍथलेटीक्स प्रकारात पहिलेवहिले पदक मिळवून दिले. त्याने या ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले व इतिहासातील दुसरे सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.

अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मीटर भालाफेक करून नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.

अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.

https://twitter.com/Olympics/status/1423980083656732675

या खेळाडूंना मिळाले रौप्य व कांस्य पदक
नीरजने सुवर्णपदक पटकावल्यानंतर रौप्य पदकावर चेक रिपब्लिकच्या जाकुबने ८६.६७ मीटर भाला फेकून आपला हक्क सांगितला. कांस्य पदक त्याचाच संघ सहकारी वेस्ली याने ८५.४४ मीटर भाला फेकून आपल्या नावे केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

त्या राहुल सारखाच हा राहुल आहे; ‘या’ दिग्गज गोलंदाजाने द्रविडशी केएलची केली तुलना

भारतीय गोल्फर अदिती अशोकला ऑलिम्पिकमधील पदकाने हुलकावणी दिली, पण देशासाठी ती इतिहास ठरली

जय बजरंगा! टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पूनियाने मिळवून दिले कुस्तीतील दुसरे पदक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---