नुकताच न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (1st Test Match) पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 10 विकेट्सने जिंकला. तसेच मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. यानंतर 29 फेब्रुवारीपासून हेगली ओव्हल (Hagley Oval), ख्राईस्टचर्च (Christchurch) येथे भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताची फलंदाजी न्यूझीलंड गोलंदाजांच्या उसळी चेंडूपुढे संघर्ष करताना दिसली. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने (Neil Wagner) आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी वॅगनर म्हणाला की, भारतीय फलंदाजांना ख्राईस्टचर्च येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तोंडावर येणाऱ्या उसळी चेंडूचा सामना करावा लागेल.
याविषयी बोलताना वॅगनर म्हणाला की, न्यूझीलंड संघ शनिवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही हीच रणनीती वापरणार आहे. “निश्चितच भारतीय संघाला येथे खेळण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कारण येथील खेळपट्टीवर चेंडूचा वेग आणि उसळीचे प्रमाण जास्त आहे. मात्र भारतात असे नव्हते. कारण भारताच्या खेळपट्टीवर चेंडूचा वेग आणि उसळीचे प्रमाण कमी आहे.”
न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिका केवळ 2 सामन्यांची आहे. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना पुरेसा वेळ नाही मिळाला. “कित्येक वेळा जेव्हा तुम्ही परदेशी दौऱ्यावर असता, तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी एक किंवा दोन सामन्यांचा वेळ लागतो. भारतीय संघ चांगली कामगिरी करून मालिकेत पुनरागमन करेल यात कोणतीही शंका नाही,” असेही यावेळी वॅगनर म्हणाला.
वॅगनर आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे पहिला कसोटी सामना खेळला नव्हता.
आयपीएलमध्ये टाॅम करन या दोन भारतीय खेळाडूंची विकेट घेणारचं
वाचा- ????https://t.co/9rg0SpAFtX????#म #मराठी #Cricket #IPL2020 @tomcurrans— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020
अशी कामगिरी करणे भल्याभल्यांना जमत नाही, पण १६ वर्षीय शेफालीने ती करुन दाखवली!
वाचा- ????https://t.co/KIQ2gynuKf????#म #मराठी #Cricket @TheShafaliVerma— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020





