क्रिकेटमध्ये अनेकदा असे खेळाडू आहेत, ज्यांनी दुखापत झाली असतानाही मैदानात उतरण्याची जिद्द दाखवली आहे. असाच एक खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज नील वॅगनर. त्याला पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळताना पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तरी त्याने फ्रॅक्चर झालेल्या अंगठ्याने तब्बल 28 षटके गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या होत्या. ही गोष्ट तो कशी करु शकला याबाबत त्याने खुलासा केला आहे.
डेली मेल सोबत बोलत असताना नील वॅगनरने त्या कसोटी सामन्यात संदर्भात प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘हे खूपच भीतीदायक होते. मी सतत विचार करत होतो की, मी हे का करीत आहे परंतु, मला त्याचा एक भाग व्हायचे होते. विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यांमध्ये जाण्यासाठी आम्हाला दोन्ही कसोटी सामने जिंकणे गरजेचे होते आणि संघ महत्त्वाचा होता. मी जे केले त्याचा मला आनंद आहे. मला जिद्दीने खेळायला आवडते. मला न्यूझीलंडसाठी खेळायला आवडते. नेहमीच शॉर्ट पिचवर चेंडू टाकणे सोपे नसते. परंतु, ही अशी गोष्ट आहे जी मला करायला खूप आवडते.’
आयसीसी कसोटी क्रमवारीत नील वॅगनर सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 219 बळी घेतले आहेत. त्याने न्यूझीलंड संघासाठी 51 कसोटी सामने खेळले आहेत. आता तो भारताविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसू शकतो. हा सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुलसोबत डान्स करत असलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? घ्या जाणून
‘स्पिनर आणि स्किपरसह!’ धनश्री वर्माने शेअर केला फ्लॅशबॅक फोटो