वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कमकुवत वाटणारे संघही बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारताना दिसत आहेत. मागील 3 दिवसात 2 मोठे उलटफेर पाहायला मिळाले. यामुळे चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या. स्पर्धेच्या 15व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स संघ धरमशाला येथे आमने-सामने होते. या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 38 धावांनी धावांनी पराभूत करत मोठा उलटफेर केला. नेदरलँड्सच्या विजयामुळे पॉईंट्स टेबलचे सर्व गणित बदलले. यामुळे भारतीय संघाचाही मोठा फायदा झाला.
नेदरलँड्सने केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव
नेदरलँड्स (Netherlands) संघाचा विजय भारतीय (Team India) संघासाठी मोठी भेट ठरली. दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाच्या पराभवामुळे भारतीय संघ अजूनही विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) अव्वलस्थानी विराजमान आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाचा नेट रनरेट भारतापेक्षा चांगला होता. मात्र, आता पराभवामुळे नेट रनरेट (+1.385) कमी झाला.
India and New Zealand are the early pacesetters as other sides start making their moves 👊
Which teams will secure a critical top-four spot at #CWC23? pic.twitter.com/77oJPqcBfF
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 18, 2023
जर टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याच्या आफ्रिका संघाने हा सामना जिंकला असता, तर भारत (+1.821) अव्वलस्थानावरून घसरला असता. मात्र, नेदरलँड्स संघाने मोठा उलटफेर करत भारताचे स्थान कायम राहिले. दुसरीकडे, न्यूझीलंड अजूनही दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका संघही आपल्या तिसऱ्या स्थानीच कायम आहे. तसेच, चौथ्या स्थानी पाकिस्तान संघ आहे.
दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना पावसामुळे 43 षटकांच्या झालेल्या सामन्यात 8 विकेट्स गमावत 245 धावा केल्या. या धावांमध्ये कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याचे मोलाचे योगदान होते. त्याने 69 चेंडूत नाबाद 78 धावांची सर्वोच्च खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ 42.5 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 207 धावाच करू शकला. त्यामुळे नेदरलँड्स हा सामना 38 धावांनी जिंकण्यात यशस्वी झाला. हा त्यांचा विश्वचषकातील पहिला विजय ठरला. (netherlands cricket team defeated south africa in an upset gift for india see cwc23 points table)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखल्यानंतर नेदरलँड्सच्या कर्णधाराचे मोठं विधान; म्हणाला, ‘आता आमचे लक्ष फक्त…’
‘आमचा संघ फारसा…’, अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लिश गोलंदाजाचं खळबळजनक वक्तव्य