---Advertisement---

हे वागणं बरं नव्हं! गोल्डन ग्लोव विजेत्याकडून अश्लील कृत्य, नेटकरी भलतेच संतापले

On: सोमवार, डिसेंबर 19, 2022 2:02 PM
Emiliano Martinez Vulgure gesture
---Advertisement---

फीफा विश्वचषकाचा अंतिमा सामाना रविवारी (दि. 18 डिसेंबर) कतारमधील लुनेेल येथे खेळला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांमध्ये चित्तथरारक सामना बघायला मिळाला. अर्जेंटिनाना हा सामना पेनाल्टी शुटआऊटमध्ये 4-2ने जिंकला. या पेनाल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या गोलकीपर इमिलियानो मार्टिनेझ दोन गोल सेव करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र, सामना संपल्यानंतर त्याने असे कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर टीकांचा भडीमार होऊ लागला.

अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवल्यानंतर संघाचा जल्लोष सुरु झाला. त्यानंतर फीफा विश्वचषकात सर्वोत्कृष्ट गोलकीपरसाठी देण्यात येणारा ‘गोल्डन ग्लोव्ज’ पुरस्कार अर्जेंटिनाच्या इमिलियानो मार्टिनेझ (Emiliano Martinez) याला देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने असे काहीतरी केले ज्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. त्याने मिळालेल्या गोल्डन ग्लोव्जसोबत अश्लिल कृत्य केले. यामुळे नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. काही चाहत्यांनी म्हटलय की हे वागणे बरे नाही.

फीफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रांस आणि अर्जेंटिना एकमेकांना भिडले. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने 2-0ची मोठी आघाडी घेतली होती. कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Messi) याने 23व्या मिनीटाला आणि ऐंजल डी मारिआ (Angel Di Maria) याने 36व्या मिनीटाला गोल केला होता. 79 मिनिटाप्रर्यंत फ्रांंसने एकही गोल केेलला नव्हता. त्यानंतर मैदानात एक चमत्कार बघायला मिळाला, ज्याने सर्वाचेंच डोळेे विस्फारले. फ्रांसच्या एम्बाप्पेने 80व्या आणि 81व्या मिनीटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाल्याने 30 मिनीटांचा अधिकचा वेळ देण्यात आला. त्यानंतर मेस्सीने 108व्या मिनीटाला गोल करत आघाडी मिळवली पण एम्बाप्पेने 108व्या मिनीटाला गोल केला आणि सामना पुन्हा 3-3नेे बरोबरी झाली. त्यानंतर सामन्याचा निकाल पेेनाल्टी शुटआऊटने ठरवण्यात आला.

पेनाल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टिनेझ याने फ्रान्सचे दोन गोल अडवत संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.त्यामुळे पेनाल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2ने फ्रान्सचा पराभव केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्रॉफीचे चुंबन आणि स्टेजवर डान्स; विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनल मेस्सीने ‘असा’ केला जल्लोष
मेस्सीने चाहत्यांना दिलेला शब्द मोडला! विश्वचषक जिंकताच बदलला निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---