---Advertisement---

पुढील ३ हंगामांसाठी मुंबई इंडियन्समध्ये ‘या’ सदस्याची झाली एन्ट्री; खेळाडूंनीच करून दिली ओळख

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 4:47 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आतापर्यंत ५ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. आता पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांना रिटेन केले आहे. दरम्यान, या स्पर्धेचा लिलाव होण्यापूर्वी या संघात नवीन सदस्याची एन्ट्री झाली आहे.

आयपीएल २०२२ स्पर्धेत मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा नवीन संघासह जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. परंतु, यावेळी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवीन सदस्याची एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर सर्वांनी स्पॉन्सर म्हणून सॅमसंगचं नाव पाहिलं होतं, परंतु येणाऱ्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाला नवा स्पॉन्सर मिळाला.

मुंबई इंडियन्सने ‘स्लाईस’ची प्रिंसीपल पार्टनर म्हणून घोषणा केली आहे. येणाऱ्या ३ वर्षांसाठी ९० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर पुढे स्लाईस कंपनीचा लोगो दिसेल. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने टीव्हीएस एयरोग्रीपसोबत ३ वर्षांसाठी १०० कोटींचा करार केला होता.

मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केलेले खेळाडू जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रिंसिपल स्पॉन्सरची ओळख करताना दिसून येत आहेत.

आयपीएल २०२२ स्पर्धेचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या लिलाव सोहळ्यात मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा मजबूत खेळाडू आपल्या संघात समाविष्ट करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

धोनीच्या कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या कारची भर! लिलावात खरेदी केली ‘ही’ क्लासिक गाडी

धक्कादायक! भारताचे सहा क्रिकेटर कोरोना पॉझिटीव्ह, स्वतः प्रशिक्षकांवर खेळाडूंना पाणी पाजण्याची आली वेळ

हे नक्की पाहा:

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---