---Advertisement---

आयपीएलची नवी नियमावली वाचलीत का? स्टँडमध्ये चेंडू गेल्यास त्याने नाही खेळला जाणार सामना

---Advertisement---

आयपीएलच्या १४ व्या हंगामात मे महिन्यात कडक बायो बबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला होता. खेळाडूंच्या सुरक्षिततेला पाहता आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. मात्र नुकतेच बीसीसीआयने उर्वरित आयपीएलचे सामने यूएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आयपीएलचा हा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यात एकूण ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. दरम्यान, आयपीएलचे सर्व सामने सुरळीत पार पडावे यासाठी बीसीसीआयने काही नियमावली तयार केली आहे.

इनसाईड स्पोर्ट्सच्या एका वृत्तानुसार, सामन्यादरम्यान चेंडू जर प्रेक्षक आसनांमध्ये (स्टॅन्ड) गेल्यास, त्या चेंडूचा पुन्हा वापर करण्यात येणार नाही. कोरोनाच्या नियमांनुसार, प्रेक्षक आसनात गेलेल्या चेंडूऐवजी सामन्याचे पंच नवीन चेंडूचा उपयोग करतील. त्यानंतर प्रेक्षक आसनात गेलेल्या चेंडूला सॅनिटाईज केले जाईल व त्याला क्रिकेटच्या सामानांसोबत ठेवले जाईल.

यामागचे कारण असे की, यावेळी आयपीएलच्या सामन्यांदरम्यान प्रेक्षक दिसू शकतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणामुळे बीसीसीआयने असे करण्याचे ठरविले. मागच्यावेळी प्रेक्षक आसने रिकामी होती. त्यामुळे चेंडू सॅनियाईज करुन वापरला जात असे. त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकात देखील आपणाला प्रेक्षक दिसू शकतात. याबाबत यूएई बोर्ड बीसीसीआय आणि आयसीसीसोबत चर्चा करत आहे. लवकरच याबाबत निर्णय कळवला जाऊ शकतो.

आयपीएलच्या १४ व्या हंगामात आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. त्याचबरोबर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३१ सामन्यांपैकी सर्वाधिक १३ सामने दुबईमध्ये खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर शारजाहमध्ये १० आणि अबुधाबीमध्ये ८ सामने होणार आहेत.

सर्वाधिक विजयासह दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ केवळ एका विजयासह शेवटच्या स्थानी आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. तसेच लवकरच आयपीएलचे संघ यूएईला रवाना होतील.

महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ साठी बीसीसीआयचे सूक्ष्म नियोजन, ‘असे’ असतील बायो-बबलचे नवीन नियम
शुभमंगल सावधान! न्यूझीलंडचा कोरी अँडरसन चढला बोहल्यावर; लग्नानंतर आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट
ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलेल्या खेळाडूंचे विराट कोहलीने वाढवले मनोधैर्य; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---