---Advertisement---

दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 6:54 PM
---Advertisement---

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारे आणि पाच बळी घेणारे एकमेव क्रिकेटपटू ब्रूस टेलर यांचे वेलिंग्टन येथे शनिवारी(६ फेब्रुवारी) सकाळी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. सन १९६५ मध्ये कोलकताच्या इडन गार्डनमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण करताना त्यांनी शतक झळकावले होते आणि पाच गडीही बाद केले होते.

ते मागील काही वर्षापासून आजारी होते. त्यांच्यावर काही शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) शनिवारी या विश्वस्तरीय अष्टपैलू खेळाडूच्या मृत्यू झाल्याची माहिती दिली.

आपल्या आठ वर्षाच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत (मार्च १९६५ ते जुलै १९७३) त्यांनी ३२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यांनी ३० कसोटी सामन्यात २०.४० च्या सरासरीने ८९८ धावा तर २६.६० च्या सरासरीने १११ बळी घेतले. प्रथमश्रेणी स्तरावर त्यांनी १४१ सामने खेळले.  १९६४-६५ ते १९६९-७० या काळात केंटरबरीबरोबर खेळात आपला प्रारंभिक ठसा उमटवला. त्यानंतर १०७०-७१ ते १९७९-८० च्या काळात वेलिंग्टनकडून क्रिकेट खेळले.

टेलर हे अजूनही न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये सातव्या स्थानावर आहेत. ते क्रिकेटमधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर राष्ट्रीय निवडकर्ते देखील होते आणि १९९२ च्या विश्वचषकातील संघ निवडण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

त्यांनी इंग्लंडचा तीन वेळा, पाकिस्तानचा दोन वेळा तर वेस्ट इंडिजचा एक वेळा दौरा केला होता. सन १९७८-१९७९ च्या कालावधीत त्यांनी इंग्लंडचा शेवटचा दौरा केला आणि त्यानंतर ते निवृत्त झाले. असे असले तरी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळीसह पाच बळी घेण्याचा त्यांचा विक्रम आहे, तो विक्रम आजगायत कोणत्याच क्रिकेटपटूला मोडता आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा शतक झळकावेल, दिग्गजाची भविष्यवाणी

पाच वर्षांनी दिले फ्लिंटॉफने अमिताभ बच्चन यांना उत्तर, ‘हा’ होता प्रश्न

रोहित विराटचा ‘मुंबई लोकल’ मिम तुफान व्हायरल, चाहत्यांची मिळतेय पसंती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---