---Advertisement---

सातासमुद्रापार रिषभ पंतच्या ‘रिव्हर्स स्कूप’चा जलवा; व्हिडिओ पाहून म्हणाल, सेम टू सेम!

On: सोमवार, मार्च 29, 2021 11:51 AM
---Advertisement---

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेमधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉन्वेने एक असा शॉट खेळला, ज्याने रिषभ पंतची आठवण करुन दिली. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात डेव्हन कॉन्वेने मुस्तफिजुर रहमानच्या चेंडूवरती रिव्हर्स स्कूप शॉट मारला. तो मारलेला चेंडू थर्ड मॅनच्या वरून षटकारासाठी गेला.

डेव्हन कॉनवेच्या या शॉटने सर्वांमुळे रिषभ पंतची आठवला. जेव्हा भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका खेळली गेली, तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही जोफ्रा आर्चरच्या चेंडूवरती रिव्हर्स स्कूप षटकार लावला होता. हा षटकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.

एवढेच नव्हे तर, यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यातही रिषभ पंतने गोलंदाज जेम्स अँडरसनला रिव्हर्स स्कूप षटकार लावला होता. यानंतर आता न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉन्वेनेही रिषभ पंतच्या षटकाराची पुनरावृत्ती केल्याने पुन्हा एकदा या शॉटची चर्चा रंगली आहे.

https://twitter.com/sparknzsport/status/1375999867919556610?s=20

https://twitter.com/flintoff11/status/1367789617546661892?s=20

https://twitter.com/SunRisers/status/1370373718447247363?s=20

या सामन्यात 29 वर्षीय डेव्हन कॉन्वेने 52 चेंडूत 92 धावा केल्या. डेव्हन कॉन्वेच्या या खेळीमुळे न्यूझीलंडने बांगलादेशला 66 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशला 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून ईश सोधीने 28 धावा देत 4 बळी घेतले.

महत्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्जसाठी खुशखबर; आयपीएल २०२१ पुर्वी ‘या’ अष्टपैलूचा झंझावात, चोपल्या ९५ धावा

INDvENG: पावरप्लेत पहिल्यांदाच २ विकेट्स ते फलंदाजांची आतषबाजी; वाचा भारताच्या विजयाची प्रमुख कारणे

जल्लोष असावा तर असा! इंग्लिश कर्णधार बाद होताच विराटने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---