---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जसाठी खुशखबर; आयपीएल २०२१ पुर्वी ‘या’ अष्टपैलूचा झंझावात, चोपल्या ९५ धावा

On: सोमवार, मार्च 29, 2021 11:23 AM
---Advertisement---

रविवारी (२८ मार्च) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाला ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लावला आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लिश संघासमोर ३३० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघाकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद ९५ धावांची खेळी केली. परंतु त्याला सामना जिंकून देण्यात अपयश आले. परंतु याचा फायदा एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स संघाला येणाऱ्या आयपीएल स्पर्धेत नक्की होऊ शकतो.

सॅम करनने लढवली खिंड, पण..

इंग्लिश संघाकडून २२ वर्षीय युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने महत्वाची अर्धशतकी खेळी केली. परंतु त्याला इंग्लिश संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारतीय संघाने ३३० धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना इंग्लिश संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतले होते.

अवघ्या १६८ धावांवर ६ गडी बाद झाले असताना, सॅम करन मैदानात आला होता. सर्वांना वाटू लागले होते की भारतीय संघ एकहाती सामना जिंकेल. अशा परिस्थितीत त्याने आदिल राशिदसोबत मिळून महत्वाची भागिदारी केली. पुढे एका बाजूने विकेट जात असतानाही त्याने चौफेर फटकेबाजी करत ९ चौकार आणि ३ षटकारांचा मदतीने नाबाद ९५ धावा चोपल्या.

चेन्नई सुपर किंग्ज खुश

हा सामना इंग्लिश संघाने गमावला असला तरी एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल. अष्टपैलू खेळाडू सॅम करन आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्याचे फॉर्ममध्ये येणे चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी शुभ संकेत आहेत.

युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात सॅम करनने चेन्नई संघासाठी सलामी फलंदाजी देखील केली होती. त्यामुळे या हंगामात त्याला सलामी करण्याची संधी मिळाली तर तो संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.

सॅम करनची आयपीएल कारकिर्द

सॅम करनने २०१९ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत २३ सामने खेळले आहेत. यात त्याने २३.४ च्या सरासरीने २८१ धावा केल्या आहेत. यात त्याने २ अर्धशतक झळकावले आहेत. यासोबतच त्याने २३ गडी देखील बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvENG: पावरप्लेत पहिल्यांदाच २ विकेट्स ते फलंदाजांची आतषबाजी; वाचा भारताच्या विजयाची प्रमुख कारणे

लाडक्या लेकाला उचलून घेत हार्दिकचा भन्नाट डान्स, पत्नीनेही दिली साथ; बघा झक्कास व्हिडिओ

जल्लोष असावा तर असा! इंग्लिश कर्णधार बाद होताच विराटने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---