वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात बेसिन रिझर्व स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आज(24 फेब्रुवारी) 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हा विजय न्यूझीलंडसाठी खास ठरला आहे. कारण हा त्यांचा 100 वा कसोटी विजय आहे.
त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवणारा न्यूझीलंड सातवा संघ ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत या संघांनी 100 कसोटी विजयांचा टप्पा पार केला आहे.
न्यूझीलंडने आत्तापर्यंत 441 कसोटी सामने खेळताना 100 विजय मिळवले आहेत. तर 175 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि 166 सामने अनिर्णित राहिले आहेत.
आत्तापर्यंत कसोटीमध्ये सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियाने मिळवले आहेत. त्यांनी 393 विजय मिळवले आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ इंग्लंड असून त्यांनी 371 विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे केवळ या दोन संघांनाच 300 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी विजय आत्तापर्यंत मिळवता आले आहे. अन्य 5 संघांनी अजून 200 कसोटी विजयांचाही टप्पा पार केलेला नाही.
कसोटीत सर्वाधिक सामने जिंकणारे संघ –
393 विजय – ऑस्ट्रेलिया (830 सामने)
371 विजय – इंग्लंड (1022 सामने)
174 विजय – वेस्ट इंडिज (545 सामने)
165 विजय – दक्षिण आफ्रिका (439 सामने)
157 विजय – भारत (541 सामने)
138 विजय – पाकिस्तान (448 सामने)
100 विजय – न्यूझीलंड (441 सामने)
पहिल्या कसोटीत टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा दणदणीत विजय
वाचा👉https://t.co/DbYuBNFHUe👈#म #मराठी #cricket #INDvsNZ #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020
केवळ त्या व्यक्तीमुळे जसप्रीत बुमराह आज आहे भारतीय संघातhttps://t.co/ymEDUMn2Zu#म #मराठी #cricket #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020