…म्हणून पहिल्या कसोटीत १०० हा आकडा न्यूझीलंडसाठी ठरला महत्त्वाचा

वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात बेसिन रिझर्व स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आज(24 फेब्रुवारी) 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हा विजय न्यूझीलंडसाठी खास ठरला आहे. कारण हा त्यांचा 100 वा कसोटी विजय आहे.

त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवणारा न्यूझीलंड सातवा संघ ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत या संघांनी 100 कसोटी विजयांचा टप्पा पार केला आहे.

त्याचबरोबर हा सामना न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना होता. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 या तीन्ही प्रकारात प्रत्येकी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

तसेच टेलर 100 कसोटी सामने खेळणारा न्यूझीलंडचा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडकडून डॅनिएल विट्टोरी(112), स्टिफन फ्लेमिंग(111) आणि ब्रेंडन मॅक्यूलम(101) यांनीच 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

You might also like