---Advertisement---

पहिली टेस्ट चॅम्पियनशीप तोच संघ जिंकेल जो ‘ही’ गोष्ट उत्तम करेल, ब्रेट लीने मांडले मत

On: शनिवार, जून 5, 2021 7:19 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना साऊथॅम्पटन येथे होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, ही पहिलीच कसोटी अजिंक्यपद स्पर्धा असल्याने सर्वांनाच या सामन्याबद्दल उत्सुकता आहे. या सामन्याबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते देखील व्यक्त केली आहेत. आता यात ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीचा देखील समावेश झाला आहे.

माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट लीचे म्हणणे आहे की, येत्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळणारे भारतीय आणि न्यूझीलंड संघ दोघेही एकसमान वाटत आहेत. तरीही, न्यूझीलंड संघ हा भारताचा एक पाउल पुढे आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती(आईसीसी)च्या वेबसाईट सोबत बोलताना ब्रेट ली म्हणाला की, येत्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ‘न्यूझीलंड’ संघ पुढे असेल असे त्याला वाटते.

ब्रेट ली म्हणाला, ‘हे सांगण कठीण आहे की, कोणता गोलंदाज ह्या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करतो. भारतीय गोलंदाजांबद्दल बोलल्यास भारतीय गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतील असा विश्वास आहे. न्यूझीलंड संघाकडेसुद्धा गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे गोलंदाजी बरोबरीची होईल.’

ब्रेट ली पुढे म्हणाला की, ‘न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांना एवढे कठीण काही वाटणार नाही, कारण ही खेळपट्टी त्यांच्या घरच्या खेळपट्टी सारखीच आहे. त्यामुळे त्यांना ह्या खेळपट्टी वर ‘स्विंग आणि सीम’ ह्या दोन्ही गोष्टी करणे सोपे जाईल. म्हणूनच ह्या सामन्यात न्यूझीलंड संघ भारतीयांच्या एक पाउल पुढे आहे. भारतीय संघाकडे काही अनुभवी फलंदाज आहेत, जे ह्या स्विंग चेंडूचा सामना करतील. जो संघ चांगले गोलंदाजी प्रदर्शन करेल तो संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा मानकरी ठरेल.’

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिला सामना खेळत असलेल्या रॉबिन्सनची कारकीर्द धोक्यात? आठ वर्षांपूर्वीच्या ट्विटने आला अडचणीत

‘या’ खेळाडूकडून धोनी घेतो नेतृत्व करताना सल्ला, ऋतुराज गायकवाडने सांगितले नाव

विश्वचषकात धोनी रन-आऊट झाला तेव्हा ‘अशी’ होती न्यूझीलंडच्या खेळाडूंची प्रतिक्रिया, निशामने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---