इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना कोणताही क्रिकेटप्रेमी अजूनही विसरलेला नाही. भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना दिग्गज यष्टीरक्षक व माजी कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी शेवटच्या क्षणी बाद झाला. सामन्यात भारतीय संघ माघारलेला असताना धोनीने रवींद्र जडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला व संघाला विजयाकडे नेले होते. मात्र, डावाच्या ४९ व्या षटकात मार्टिन गप्टिलच्या सरळ थ्रोवर धोनी अवघ्या एका इंचांने धावबाद झाला आणि तो बाद होताच भारतीय संघाचा पराभव निश्चित झाला.
धोनी बाद झाला त्यावेळी न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या मनात काय चालले होते, याविषयीचा खुलासा न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशाम याने नुकताच केला.
तेव्हा निशामची होती अशी प्रतिक्रिया
विश्वचषकातील उपांत्य सामन्यात धोनी बाद होण्यापूर्वी व तो बाद झाल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय होती, असा प्रश्न एका चाहत्याने ट्विटरवरून जिमी निशामला विचारला. त्याने यावर उत्तर देताना लिहीले, ‘बाद होण्यापूर्वी- शांत! आपण संभाव्यता जिंकू शकतो.
बाद झाल्यावर- शांत! आपण निश्चित जिंकू.’
जिमी निशाम हा सातत्याने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याला चाहते अनेकदा ट्रोलदेखील करतात.
Before: Cool we’re probably gonna win
After: Cool we’re definitely gonna win https://t.co/YaX1zXvyD7— Jimmy Neesham (@JimmyNeesh) June 4, 2021
असा झाला होता सामना
विश्वचषकातील या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २४० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताने कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा व केएल राहुल या तिघांचे बळी अवघ्या पाच धावांमध्ये गमावले. भारताने ९२ धावांत ६ गडी गमावल्यानंतर धोनी व जडेजाने ११६ धावांची भागीदारी करून सामन्यात रंगत आणली. परंतु, जडेजा व धोनीपाठोपाठ बाद झाल्याने भारताला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही आणि १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
महत्त्वाच्या बातम्या –
राशीद खान करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? पाहा काय दिलं उत्तर
‘इंग्लंडमध्ये कसोटी खेळणे एक आव्हान, पण…’, दिग्गज भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने दिले आपल्याच बोर्डाला आव्हान; ‘बॉल टेम्परिंग’ प्रकरणी केली ‘ही’ मागणी.






