---Advertisement---

सीमारेषेवर हवेत गुलाटी मारत न्यूझीलंडच्या क्रिकेटरचा अविश्वसनीय झेल; पाहून तुमच्याही तोंडूल निघेल, ‘सुपर!’

On: शनिवार, नोव्हेंबर 27, 2021 8:03 PM
---Advertisement---

न्यूझीलंडमध्ये सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, सुपर स्मॅश डोमेस्टिक टी२० लीगचा थरार सुरू आहे. शुक्रवार रोजी (२६ नोव्हेंबर) या स्पर्धेतील पहिला सामना ख्राईस्टचर्च येथे झाला. या सामन्यात वेलिंग्टन आणि कँटरबरी हे संघ आमने सामने होते. वेलिंग्टनने सांघिक प्रदर्शन करत २७ धावांनी हा सामना खिशात घातला. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नाथन स्मिथ याने वेलिंग्टन संघाचे प्रतिनिधित्त्व करताना, सर्वांना थक्क करणारा असा झेल टिपला आहे. त्याच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

तर झाले असे की, या सामन्या प्रथम फलंदाजी करताना वेलिंग्टन संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ७ बाद १७७ धावा केल्या होत्या. वेलिंग्टनच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर चाड बाऊझ आणि केन मेकक्लर मैदानावर बोते. वेलिंग्टनकडून हामिश बेनेट त्याचे पहिले षटक टाकत होता. बेनेटने या षटकातील तिसरा चेंडू वेगाने लेग स्टंपवर टाकला. फलंदाज मॅक्कलरने या चेंडूला चौकारासाठी पाठवले.

यावेळी सीमारेषेववर स्मिथ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्याने हा चेंडू अडवण्यासाठी वेगाने सीमारेषेकडे धाव घेतली आणि हवेत उडी मारत चेंडूला सीमारेषेच्या आत फेकले. पुढे पुन्हा मैदानाच्या आत येत हवेत गुलाटी मारत त्याने चेंडू पकडला. स्मिथच्या या अविश्वसनीय झेलमुळे वेलिंग्टन संघाला दमदार सुरुवात मिळाली. एका धावेवर पहिले यश मिळाल्यानंतर वेलिंग्टन संघाने पुढे अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत कँटरबरी संघाला १५० धावांवरच रोखले.

क्षेत्ररक्षणात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या स्मिथने गोलंदाजातही २ विकेट्सचे योगदान दिले. ४ षटके टाकताना ४० धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/cricketwgtninc/status/1464132950128136192?s=20

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, वेलिंग्टन संघाने सलामीवीर फिन ऍलनच्या अर्धशतकाच्या जोरावर डावाखेर १७७ धावा उभारल्या होत्या. कँटरबरी संघाकडून नटालने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कँटरबरी संघाकडून एकाही फलंदाजाला साधे अर्धशतकही करता आले नाही. जॅक बोयल ३१ धावा करत कँटरबरी संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. या डावात वेलिंग्टनकडून मिलेच ब्रेसवेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

‘धाकड’ गोलंदाजी करूनही अक्षर ३३ वर्ष जुन्या विक्रमापासून राहिला वंचित

आठवणीतील सामना: भारत विंडीजला हरवून बनला होता हीरो कप विजेता, कुंबळेने घेतलेल्या ६ विकेट्स

कानपूर कसोटीत व्हायरल झालेला ‘गुटखा मॅन’ म्हणतोय, “आता मी वैतागलोय”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---