---Advertisement---

‘क्रिकेट बॅट विक्रीला! संपर्क – स्मिथ व बर्न्स’, न्यूझीलंड प्रेक्षकाकडून ट्रोलिंग

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 10:39 AM
---Advertisement---

ख्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात सध्या ख्राईस्टचर्च येथील हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. खरंतर स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेले प्रेक्षक आगळ्या-वेगळ्या गोष्टी करत सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात, असाच एक प्रकार न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाहायला मिळाला.

सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका चाहतीने हातात एक पोस्टर धरले आहे. यावर लिहीले आहे की ‘क्रिकेट बॅट विक्रीला आहेत. खुप कमी वापरल्या आहेत. संपर्क क्रिकेट ऑस्ट्रेलिया येथे स्टिव्ह स्मिथ आणि जो बर्न्सला करावा.’

या पोस्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंड-पाकिस्तान सामना सुरु असताना ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि बर्न्सला ट्रोल केले जात असल्याचेही अनेकांना आश्चर्य वाटले आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

खरंतर सध्या ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले २ सामने पार पडले असून १-१ ने मालिका बरोबरीत आहे. या दोन्ही सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि जो बर्न्स यांना मोठ्या धावा करता आलेल्या नाहीत. त्याचमुळे या चाहतीने हे पोस्टर झळकावले असावे.

स्मिथने या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये ४ डावात अनुक्रमे १,१*,० आणि ८ अशा मिळून एकूण १० धावा केल्या आहेत. तर बर्न्सने ८, ५१*, ० आणि ४ अशा धावा केल्या आहेत.

स्मिथ आणि बर्न्स या दोघांनाही त्यांच्या खराब कामगिरीचा फटका आधीच बसला आहे. स्मिथला कसोटी क्रमवारीत आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला असून तो तिसऱ्या स्थानी घसरला आहे. तर बर्न्सला ऑस्ट्रेलियन संघातील जागा गमवावी लागली आहे. त्याला सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

AUS vs IND: सिडनी कसोटीसाठी ‘एवढ्या’ प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी

आनंदाची बातमी! रोहित, पंतसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह

शुभमंगल सावधान! अर्जूनवीर कुस्तीपटू राहुल आवारे अडकला लग्नबंधनात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---