---Advertisement---

SA vs NZ: न्यूझीलंडची फायनलमध्ये एँट्री, सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा!

On: बुधवार, मार्च 5, 2025 10:21 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील दुसरा सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळला गेला. दरम्यान दोन्ही संघ लाहोरच्या मैदानावर आमने-सामने होते. त्यामध्ये मिचेल सँटनरच्या (Mitchell Santner) नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने शानदार विजय मिळवला आणि चम्पियन्स ट्राॅफीच्या फायनल मध्ये प्रवेश केला. (South Africa vs New Zealand Semifinal 2) आता न्यूझीलंड संघ (9 मार्च रोजी) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताविरूद्ध फायनल खेळेल. (India vs New Zealand Final)

या सामन्यात न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो संघासाठी योग्य ठरला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर 362 धावा लावल्या. न्यूझीलंडसाठी युवा रचिन रवींद्रने (Rachin Ravindra) शानदार शतक झळकावले. दरम्यान त्याने 108 धावांची खेळी केली. तसेच दिग्गज फलंदाज आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) देखील शतक ठोकले. त्याने 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या.

डेरिल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स या दोघांनी देखील प्रत्येकी 49 धावा करत न्यूझीलंडसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी गोलंदाजी करताना लुंगी एनगिडीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर कागिसो रबाडाने 2 तर मुल्डरने 1 विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेला 363 धावांचे विक्रमी लक्ष्य गाठायचे होते. दरम्यान कर्णधार टेम्बा बावुमाने 56 धावा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने 69 धावांची खेळी केली. परंतु, मधल्या षटकांमध्ये कोणतीही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. डेव्हिड मिलरने निश्चितच 67 चेंडूत 100 धावांची तुफानी शतकी खेळी खेळली. या शतकी खेळीत त्याने 10 चौकारासह 4 षटकार ठोकले. पण त्याचे हे शतक संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

65 वर्षीय गोलंदाजाने रचला इतिहास..! 13.4 षटक, 20 धावा अन् 10 विकेट्स
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव; हरले तरी लाखो..!
IPL 2025 साठी बीसीसीआयचे कडक नियम! ‘व्हीआयपी संस्कृती’ संपवण्याचा निर्णय 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---