भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या संघातून बाहेर आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी राहुलला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यातही राहुल फिटनेसच्या कारणास्तव खेळताना दिसणार नाहीये. असे सांगितले जात आहे की, आशिया चषक २०२२ मध्ये राहुल पुनरागमन करेल. मात्र, न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्कॉट स्टारयरिसच्या मते राहुलसाठी संघात पुनरागमन करणे सोपे नसेल.
स्कॉट स्टायरिस (Scott Styris) याच्या मते केएल राहुल (KL Rahul) भारताचा महत्वाचा खेळाडू असला तरी, तो मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. अशात संघात पुनरागमन करणे त्याच्यासाठी सोपे नसेल. संघात परतल्यानंतर राहुल पहिल्यासारखा खेळू शकेल याची खात्री देता येणार नाही. तसेच दरम्यानच्या काळात या युवा खेलाडूंना संधी मिळाली, त्यांनीही संघात संधी मिलण्यासाठी दावेदारी सिद्ध केली आहे.
माध्यमांशी बोलताना स्टायरिस म्हणाला की, “खेळाडूंसाठी ही एक वेगळी मानसिकता आहे. त्यांना संघातून बाहेर व्यायचे नाहीये आणि इतर खेळाडूंना संधीही द्यायची नाहीये. मला नाहीत आहे की, भारतीय संघात एक चांगली संस्कृती आहे आणि त्यामुळेच त्याला (राहुल) इतर खेळाडूंना संधी देण्यात काहीच अडचण नाहीये. एका खेळाडूच्या रूपात मला स्वतःला हे माहिती आहे की, तुम्ही कधीच दुसऱ्या कुणाला तुमची जागा घेण्याची संधी देत नाही.”
“सद्या तो दुखापतग्रस्त आहे आणि संघातून बाहेर आहे. याचा सरळ असा अर्थ आहे की इतर खेळाडू ते करू शकतात, जे सूर्यकुमार करू शकतो, जे रिषभ पंत करत आहे. ते खेळाडू तिथे आहेत आणि धावा करण्याची कुठलीच संधी सोडत नाहीयेत. तसेच निवडकर्त्यांच्या मनात असा प्रश्न उपस्थित करत आहेत की, खरच केएल राहुलची संघाला गरज आहे का? जेव्हा तो संघात पुनरागमन करेल, तेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये असेल का? त्याने खूप क्रिकेट मिस केलं आहे, खूप सारे प्रश्न फक्त यामुळे उपस्थित झाले आहेत, कारण की निवडर्ते आता त्याठिकाणी इतर खेळाडूंनाही संधी देऊ शकतात,” असेही स्टायरिस पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी राहुलला ग्रोईन एंन्जरी झाली होती. त्याने या दुखापतीवर जर्मनीमध्ये जाऊन शस्त्रक्रिया देखील केली. मात्र अद्याप राहुल पूर्णपणे फिट झाल्याचे दिसत नाही. शस्त्रक्रियेनंतर चाहत्यांना त्याला एकदाही फलंदाजी कराताना पिहिले नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया कपचे आयोजनस्थळ बदलूनही श्रीलंका क्रिकेट बोर्ड कमावणार रग्गड पैसा
प्रो कबड्डी लीग २०२२चा सुरू होतोय थरार; कधी आणि कुठे होणार लिलाव? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सूर्यकुमारवरून आपापसांत भिडले २ भारतीय दिग्गज; श्रीकांत कैफला म्हणाले, तू असं केलं असता का?