वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (दि. 28 ऑक्टोबर) डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. म्हणजेच एकाच दिवशी दोन सामन्यांचे आयोजन होणार आहे. यातील पहिला म्हणजेच स्पर्धेचा 27वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड या बलाढ्य संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात न्यूझीलंड संघात बदल आहेत. मार्क चॅपमन याच्या जागी जिमी नीशम याची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघातही मोठा बदल आहे. कॅमरून ग्रीन बाहेर पडला असून त्याच्या जागी ट्रेविस हेड संघात परतला आहे.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 स्पर्धेतील उभय संघांच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. मात्र, न्यूझीलंडने त्यातील 4 सामने जिंकले आहेत, तर त्यांना 1 सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघाने 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यात त्यांनी पराभव पत्करला आहे.
न्यूझीलंड संघाने स्पर्धेतील पहिले सलग 4 सामने खिशात घातले आहेत. त्यानंतर त्यांना पाचव्या सामन्यात भारताविरुद्ध 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. अशात हा सामना जिंकत न्यूझीलंड पॉईंट्स टेबलमधील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुढील तिन्ही सामन्यात विजयाची हॅट्रिक केली. अशात, ऑस्ट्रेलियादेखील आपला विजयी रथ कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. (New Zealand have won the toss and have opted to field against australia)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, ट्रेविस हेड, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, ऍडम झम्पा.
न्यूझीलंड
टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
हेही वाचा-
‘आमच्यासाठी दरवाजे…’, सलग चौथ्या निराशाजनक पराभवानंतर Babar Azam भावूक, सहकाऱ्यांबद्दल केलं मोठं विधान
चेपॉकवर रंगला वर्ल्डकपचा पहिला थ्रिलर! रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेची पाकिस्तानवर मात, महाराज ठरला हिरो