मार्च महिन्याअंती नेदरलँडचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर (Netherland On New Zealand Tour) जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघ टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहेत. परंतु या दौऱ्यावेळीच जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. २६ मार्च ते २९ मे दरम्यान आयपीएल २०२२ चे (IPL 2022) सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंडचे खेळाडू नेदरलँडविरुद्धच्या मालिकांमध्ये खेळणार नसल्याची (New Zealand Players Not Playing Against Netherland) माहिती पुढे आली आहे.
न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सोमवारी (०७ मार्च) एका पत्रकार परिषदेदरम्यान याबद्दल माहिती दिली आहे. “आयपीएल २०२२ खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या मुख्य संघातील जवळपास सर्वच खेळाडू नेंदरलँडविरुद्धच्या मालिकांमध्ये खेळणार नाहीत,” असे गॅरी स्टीड म्हणाले आहेत.
आयपीएल २०२२ मध्ये एकूण १० संघ खेळणार असल्याने यंदाचा हंगाम अजूनच खास असणार आहे. या हंगामात न्यूझीलंडचे २९ खेळाडू वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. यात काही मोठ्या नावांचाही समावेश आहे. आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने यंदा सर्वाधिक ३ न्यूझीलंडच्या खेळाडूंना विकत घेतले आहे. यामध्ये ट्रेंट बोल्ट, जिम्मी नीशम आणि डॅरेल मिचेल अशा स्टार खेळाडूंचा समावेश आहे. तर न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) हादेखील सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्त्वपदी आहे.
हेही वाचा- आयपीएल पाहण्यासाठी धोनीने चक्क ‘आऊट’ झाल्याचा बनवला बहाना, नवा प्रोमो घालतोय इंटरनेटवर धुमाकूळ
आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि कोलकातामध्ये
दरम्यान नुकतेच आयपीएल २०२२ च्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात २६ मार्च रोजी ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे.
या स्पर्धेतील दुसरा सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात खेळवला जाईल. आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे. हा सामनाही २७ मार्चला डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये खेळला जाईल. या हंगामात नव्याने सहभागी झालेले दोन संघ लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स संघ २८ मार्च रोजी एकमेकांचा सामना करतील. हे दोन्ही संघ आपला पहिला सामना वानखेडे स्टेडिअममध्येच खेळतील.
या हंगामातील शेवटचा साखळी सामना २२ मे रोजी खेळला जाईल. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघात होणार आहे. हा सामनादेखील मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: गरमा-गरमी! वॉर्नरला पाकिस्तानी गोलंदाजाकडून मिळाली खुन्नस, मग फलंदाजानेही दिले ‘असे’ उत्तर
Video: वॉर्नरची पाकिस्तानात ‘गांधीगिरी’, यजमान संघाच्या गोलंदाजांनी उकसवल्यानंतरही हसत दिले उत्तर
मोहाली कसोटी: श्रीलंकेवर भारी पडली रोहितसेना; ‘हे’ ५ खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे हिरो