आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ विकेटनी पराभूत करत जिंकला आणि किताब आपल्या नावे केला. भारतआणि न्यूझीलंड संघामध्ये चुरशीचा सामना झाला होता. या दोन्ही संघात एक उत्कृष्ट सामना बघायला मिळाला. याचा आनंद संपूर्ण जगाने घेतला. या अंतिम सामन्यात पावसाने अडथळा आणला असला तरीही न्यूझीलंड संघाने राखीव दिवशी कसोटी सामन्यामध्ये विजय मिळवला.
याचदरम्यान न्यूझीलंड क्रिकेट संघाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे भारतीय संघाला धन्यवाद दिले आहे. याच्या व्यतिरिक्त न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
न्यूझीलंडने आपल्या ‘ब्लॅककॅप्स’ नावाने असलेल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर विराट कोहली आणि केन विलियम्सन यांचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘भारतीय क्रिकेट संघाचे उत्कृष्ट कसोटीसाठी धन्यवाद आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा.’
Thank you to the Indian team for a tremendous Test. Good luck for the summer in England. #WTC21 pic.twitter.com/TVROaFTmxo
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 24, 2021
भारतीय संघाने न्यूझीलंड संघासमोर दुसऱ्या डावात 139 धावांचे लक्ष दिले होते. हे आव्हान न्यूझीलंड संघाने हे केवळ 2 विकेट गमावत साध्य केले. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलरने उत्कृष्ट फलंदाजी करत 96 धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. कर्णधार विलियम्सन 52 धावांवर तर टेलर 47 धावांवर नाबाद राहिले.
न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत. दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघ फक्त 170 धावांमध्ये सर्वबाद झाला. न्यूझीलंड संघाकडून टीम साऊदीने 4 बळी तर ट्रेंट बोल्टने 3 आणि काइल जेमीसन 2 बळी घेतल्या. भारतीय संघाने पहिला डावात 217 धावा बनवल्या होत्या. ज्याला प्रतिउत्तर देत न्यूझीलंड संघाने पहिल्या डावाच 249 धावा करत 32 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुम्ही यासाठी पात्र होता’, न्यूझीलंडच्या विजयानंतर रवी शास्त्री यांनी दाखवली खिलाडूवृत्ती
आयपीएल 2021 बाबत चाहत्यांसाठी आली एक आनंदाची बातमी, ‘या क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंना दिली परवानगी
न्यूझीलंडच्या संकेतस्थळाने सोडली पातळी, दाखवला विराटच्या गळ्यात पट्टा






