सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या 12व्या सामन्यात भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ आमने-सामने आहेत. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा माजी अनुभवी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) विक्रम मोडला गेला.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Santner) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने 249 धावा केल्या. भारताची टॉप ऑर्डर डगमगली. त्यानंतर श्रेयस अय्यर (79), अक्षर पटेल (42) आणि हार्दिक पांड्या (45) यांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 250 धावांचे आव्हान ठेवले.
न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने (Matt Henry) शानदार गोलंदाजी करून धमाकेदार सुरुवात केली, ज्यामुळे भारताला मोठे लक्ष्य निश्चित करता आले नाही. यासह हेन्रीने पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा 1 विक्रमही मोडीत काढला.
दुबईच्या मैदानावरील संथ खेळपट्टीवर, हेन्रीने त्याच्या 8 षटकांत 5.2च्या इकॉनॉमी रेटने 42 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. पहिल्या पॉवर-प्लेमध्ये शुबमन गिल आणि विराट कोहलीला बाद करून हेन्रीने भारताला मोठे धक्के दिले. यानंतर, डावाच्या शेवटी रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांना त्याने पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 27 वर्षांच्या इतिहासात भारताविरुद्ध 5 विकेट घेणारा मॅट हेन्री (Matt Henry) पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी, 2004 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात पाकिस्तानच्या नवीद-उल-हसन आणि शोएब अख्तरने भारताविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या होत्या. 2002 मध्ये कोलंबो येथे भारताविरुद्ध झिम्बाब्वेच्या डग्लस होंडोनेही 4 विकेट्स घेतल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी-
मॅट हेन्री (न्यूझीलंड) – 5/42, दुबई 2025
नावेद-उल-हसन (पाकिस्तान) – 4/25, बर्मिंगहॅम 2004
शोएब अख्तर (पाकिस्तान) – 4/36, बर्मिंगहॅम 2004
डग्लस होंडो (झिम्बाब्वे) – 4/62, कोलंबो 2002
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताविरूद्ध चमकदार कामगिरी करणारे 3 गोलंदाज
पैशांची बरसात! रणजी ट्रॉफीच्या विजेत्या व उपविजेत्यांना मोठी बक्षीस रक्कम जाहीर
विराट कोहलीचा महान विश्वविक्रम! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू






