मुंबई । न्यूझीलंड क्रिकेट संघ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर येणार होता. दोन्ही देशात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार होती. मात्र, हा दौरा आता स्थगित करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही मालिका स्थगित करण्यात आली आहे.
नुकतेच बांगलादेशच्या तीन खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर लगेचच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हा ही मालिका स्थगित करण्याची घोषणा केली.
बांगलादेशमध्ये आत्तापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1500 हजार पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात माजी कर्णधार मशरफे मुर्तजा, नजमुल इस्लाम आणि नफिस इक्बाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी म्हणाले, “कोरोनाची परिस्थिती पाहता ऑगस्टमध्ये या कसोटी मालिकेचे आयोजन करणे खूपच आव्हानात्मक आहे. खेळाडू, स्टाफ आणि आणि सुरक्षारक्षक यांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही ही मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेतला.”
ही मालिका स्थगित करण्यात आल्याने अनेक क्रिकेटपटूंची निराशा झाली असेल. भविष्यात कोरोनाची परिस्थिती पाहून मालिकेसंदर्भात नवीन तारीख जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच एप्रिल महिन्यात पाकिस्तानचा दौरा, यासोबतच मे महिन्यामध्ये आयर्लंड आणि इंग्लंड दौरा देखील स्थगित केला आहे. कोरोनामुळेच ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दौरा स्थगित केला आहे. न्यूझीलंडनेही त्यांचा नेदरलँड, आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेस्टइंडीजचा दौरे स्थगित केले आहेत. बांगलादेशच्या जुलै- ऑगस्ट महिन्यात होणार्या श्रीलंका दौऱ्यावरही कोरोनाचे सावट आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
अशाप्रकारे विराट कोहलीने बदलले जगातील सर्वात वजनदार क्रिकेटपटूचे आयुष्य
ब्रेकिंग- दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह
पाकिस्तान आणखी मोठा झटका! आता हे ७ क्रिकेटपटूही कोरोना पॉझिटिव्ह