मुंबई। आयपीएलचा 15वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. 26 मार्चपासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाईल. या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या दोन संघांनी जुन्या आठ संघांना चांगलेच आस्मान दाखवले आहे. हुकुमाचा एक्का सिद्ध झालेल्या गुजरात टायटन्सने पहिल्या सामन्यापासून आजवर जोश आणि रोमांच पुरेपूर कायम राखला आहे. यासह राजस्थान रॉयल्सला मात देत गुजरात टायटन्स आयपीएल 2022च्या फायनलमध्ये पोहोचली आहे.
स्वदेशी बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, ‘कू’वर संघाच्या विजयाचा जल्लोष होताना दिसतो आहे. मोठ्या संख्येने क्रिकेटर्स आणि चाहते संघाला विजयासाठी चीयर अप करताना दिसत आहेत.
गुजरात टायटन्सच्या विजयानंतर यात मुख्य भूमिका निभावणारे भारतीय क्रिकेटर वृद्धिमान साहाने ‘कू’च्या माध्यमातून आपला उत्साह व्यक्त केला आहे. त्याने लिहिले की, “आम्ही आता एक नवीन यशोगाथा रचणार आहोत हे जाणून एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, आम्ही टॉप२ मध्ये स्थान मिळवले आहे! शेवटपर्यंत तिथे राहून आनंद झाला.”
मोहम्मद शमीने फायनल्ससाठी अहमदाबाद जाण्यासंदर्भाने टीमचा उत्साह वाढवत म्हटले आहे की, “चला तर ‘आवा दे’चा गाजावाजा करू. गुजरात टायटन्स, लवकरच अहमदाबादमध्ये भेटूया. #aavade #mshami11 #ipl #ipl2022 #final”
माजी क्रिकेटर सबा करीमनेही टीमचे कौतुक करत म्हटले, “गुजरात टायटन्स! डेथ ओव्हर्सचे मास्टर्स. खूप शानदार विजय.”
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात में गुजरातने राजस्थान रॉयल्सला सात विकेटने हरवले. गुजरातच्या टीमने राजस्थानचे 189 धावांचे लक्ष्य तीन विकेट गमावून 19.3 षटकांमध्ये गाठले. गुजरातकडून डेविड मिलरने सर्वाधिक धावा केल्या. तो 38 चेंडूंमध्ये 68 धावा करून नाबाद राहिला. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि ओबेड मॅकॉयने एक-एक बळी घेतला. राजस्थानची टीम आता दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये लखनऊ आणि बेंगलोरमध्ये होणाऱ्या एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्याशी भिडेल.
कुठल्याही संघासाठी फायनलमध्ये स्थान मिळवणे सहजसोपे नसते. यासाठी मोठीच मेहनत लागते. हीच मेहनत केलीय गुजरात टायटन्सने. या संघाच्या धुरंधर खेळाडूंवर टाकूया एक नजर-
- गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्यांमध्ये एक आहे शमी. शमी टीमसाठी खूपच लकी सिद्ध झाला आहे.
- डेविड मिलर 94 (गुजरात विरुद्ध चेन्नई)- डेविड मिलरची 94 धावांची नाबाद खेळी तेव्हा समोर आली, जेव्हा जीटीसाठी ती सर्वाधिक मोलाची होती.
- हार्दिक पांड्या 87 (जीटी विरुद्ध आरआर)- जीटी क्वॉलीफायर 1 मध्ये 24 तासांपेक्षाही कमी वेळात चांगली फटकेबाजी केली.
- राहुल तेवतिया (शेवटच्या दोन चेंडूंवर 12 धावा)
- वृद्धिमान साहा (67*)- वृद्धिमान साहाच्या फलंदाजीने या आईपीएलच्या हंगामात खूपच चांगला खेळ केला. त्याने केवळ 9 सामन्यांमध्ये 312 धावा केल्या आहेत.
- राशिद खान (4/24)- एक सामना, जो कुठलाच लखनऊ फॅन कधीच विसरणार नाही, राशिद खानने जीटीच्या चाहत्यांसाठी त्याला अजूनच अविस्मरणीय बनवले.
- शुभमन गिल 63 वर असतानाही गुजरातची धावसंख्या 144/4 होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनला भारताच्या टी२० संघातून वगळण्यामागे राहुल द्रविड आहे कारण? वाचा सविस्तर
‘त्यांच्यामुळेच मी चांगला क्रिकेटर बनू शकलो’, हार्दिकने यशाचे श्रेय दिले ‘या’ तिघांना
“दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है”, मिलरच्या ट्वीटला राजस्थानचा भन्नाट रिप्लाय