नुकत्याच भारताचा दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौरा पार पडला. याठिकाणी झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकाने 1-1 सामना जिंकला. मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाउनच्या न्युलैंड्स या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अक्षरशः मैदान गाजवलं. पहिल्याच दिवशी दोन्ही संघाच्या मिळून तब्बल 23 विकेट गेल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा 10 विकेट घेतल्या गेल्या.
अशाप्रकारे हा क्रिकेट सामना अवघ्या दोन दिवसात आटोपला गेला. क्रिकेट इतिहासात हा सामना आजवरचा सर्वात कमी चेंडूत संपलेला सामना ठरला. एवढ्या लवकर सामना संपल्यामुळे खेळपट्टीवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही सर्वांना खडे बोल सुनावले होते. माजी कर्णधार आणि महान क्रिकेटर सुनिल गावसकर यांनीही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. (Cape Town Pitch Rated ‘Unsatisfactory’ After Speedy India Win)
आयसीसी अशावेळी भारतीय खेळपट्ट्यांवर लगेच कारवाई करते, असेही तो म्हणाला होता. आता मात्र थेट आयसीसीने समोर येत या खेळपट्टीला खराब असल्याचा शेरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने देखील या खेळपट्टीला असमाधानकारक असा शेरा दिला आहे. आयसीसीने त्या मैदानाला एक डिमेरिट पॉईंटही दिला आहे. (Newlands pitch)
दोन्ही कर्णधारांनी व्यक्त केली होती नाराजी
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिन एल्गर आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांच्यासमोर खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर ब्रॉड यांनी आपल्या रिपोर्टमध्ये कर्णधारांच्या या तक्रारीचा उल्लेख केला होता. ते म्हणाले की, ” न्युलैंड्सच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण खुप अवघड होत, संपुर्ण सामन्यात चेंडु खुप वेगाने तर कधी-कधी अचानक बाउंस होत होता. अनेक फलंदाजांच्या ग्लोजवर चेंडू लागून अचानक झालेल्या बाउंसमुळे अनेक विकेट देखील गेल्या.”
रोहित शर्माच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- लिंक
खेळपट्टीबाबत हे आहेत आयसीसीचे नियम (ICC’s guideline for Test Match Pitches )
आयसीसीच्या नियमांनुसार, खेळपट्ट्या आणि आउटफिल्ड खूप चांगले, समाधानकारक, असमाधानकारक किंवा अयोग्य म्हणून रेट केले जाऊ शकतात. असमाधानकारक रेटिंगसाठी ठिकाणांना एक डिमेरिट पॉइंट आणि अनफिट रेटिंगसाठी तीन डिमेरिट पॉइंट दिले जातात. डिमेरिट अंक पाच वर्षासाठी ग्राह्य धरतात. जेव्हा एखाद्या ठिकाणाला सहा डिमेरीट अंक मिळतात, अशा ठिकाणी पुढील 12 महिने आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घालण्यात येते. जर हेच अंक 12 डिमेरीट पर्यंत पोहचले तर 24 महिन्यांसाठी ही बंदी घालण्यात येते.
भारतीय संघाची पुढची मालिका सोप्पी ( Afghanistan tour of India, 2024)
11 जानेवारीपासून भारतीय संघ अफगाणिस्तानसोबत 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. मोहाली (11 जानेवारी), इंदोर (14 जानेवारी) आणि बेंगलुरु (17 जानेवारी) असे हे तीन सामने होणार आहे. भारतीय टी20 संघात कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहलीने कमबॅक केले आहे. टी20 विश्वचषक 2024च्या दृष्टीने ही मालिका अतिशय महत्त्वाची समजली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाने स्टीव स्मिथला पुन्हा बनवले कर्णधार, आगामी मालिकेसाठी संघाला यश मिळवून देण्याचे आव्हान
मुजीब, फजल अन् नवीनचा परदेशी लीग खेळण्याचा मार्ग मोकळा, अफगाणिस्तान बोर्डाने उठवली बंदी