Paris Olympics 2024; वादग्रस्त अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अल्जेरियन बॉक्सरने महिला गटात सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकदरम्यान इमानच्या लिंगावरून वाद झाला होता. आता याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. जे की खरोखरचं धक्कादायक आहेत. ज्यामध्ये इमानच्या आत अनेक पुरुषांचे अवयव असल्याचे सांगण्यात आले आहे.
दस्तऐवजानुसार, वैद्यकीय अहवालात, खलिफामध्ये अंतर्गत अंडकोष आणि (XY) गुणसूत्र आहेत. जे 5-अल्फा रिडक्टेस अपुरेपणा नावाचे विकार दर्शवतात. असा धक्कादायक रिपोर्ट फ्रेंच पत्रकार जाफर ऐत औडिया यांनी समोर आणले आहे.
ऑलिम्पिक दरम्यान, इमान खलीफ विरुद्ध खेळलेल्या अनेक महिला बॉक्सर्सनी इमानमध्ये (XY) क्रोमोसोम असल्याचे हावभावांद्वारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. पॅरिसमधील क्रेमलिन-बिसेट्रे रुग्णालय आणि अल्जियर्समधील मोहम्मद लमाइन डेबघिन रुग्णालयातील तज्ञांनी 2023 च्या अहवालात अनेक खुलासे केले आहेत.
अहवालात इमानच्या जैविक वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. जसे की अंतर्गत अंडकोषांचे अस्तित्व आणि गर्भाशयाची अनुपस्थिती. याशिवाय, रेडक्सच्या अहवालानुसार, एमआरआयमध्ये इमानच्या मायक्रोपेनिसची उपस्थिती देखील समोर आली आहे. आता अहवाल समोर आल्यानंतर इमानवर काय कारवाई होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इमान खलिफाच्या लिंगावर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने 2023 मध्येही तिच्यावर बंदी घातली आहे. यासोबतच दिल्लीतील बॉक्सिंग असोसिएशनने इमानला जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदकाच्या सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती.
तिच्या लिंग विवादावर इमान खलीफेने यापूर्वी म्हटले होते की, “मी इतर महिलांप्रमाणेच एक स्त्री आहे. मी स्त्री म्हणून जन्माला आले, मी स्त्रीप्रमाणे जगते आणि मी पात्र आहे.”
IND VS AUS; “भारत ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवणार नाही…” सुनील गावस्करांची आश्चर्यकारक भविष्यवाणी
IND VS AUS; भारताच्या कमकुवतपणाचा फायदा ऑस्ट्रेलिया घेणार! हा फिरकी गोलंदाज ठरणार गेमचेंजर
न्यूझीलंडच्या पराभवानंतर भारताला जाग येईल का? ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने दिले मोठे वक्तव्य