गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या मंगळवारी गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली होती. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गंभीरकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. द्रविडसोबतच त्याच्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ अर्थात फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचाही कार्यकाळ संपुष्टात आला होता.
तथापि, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राहू शकतात. तर फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक बदलले जाणे निश्चित आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकाला आपला सपोर्ट स्टाफ निवडण्याचा अधिकार दिला असला, तरी गंभीरबाबत असे घडत नाहीये. याआधी गंभीरला विनय कुमारला गोलंदाजी करायची होती, ज्यावर बीसीसीआयने रस दाखवला नाही.
आता ‘हिंदुस्तान टाआईम्स’च्या वृत्तात म्हटले आहे की बीसीसीआयने गंभीरची क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची मागणी फेटाळून लावली आहे. गंभीरला दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज जॉन्टी रोड्सला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनवायचे होते. मात्र, बीसीसीआयला सपोर्ट स्टाफमध्ये कोणत्याही प्रकारच्या परदेशी प्रशिक्षकाचा समावेश करण्याची इच्छा नाही. बीसीसीआय गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय प्रशिक्षकांसोबत काम करत आहे.
सूत्राने अहवालात म्हटले आहे की रोड्सच्या नावाबाबत चर्चा झाली होती परंतु बोर्डाने निर्णय घेतला की सर्व सपोर्ट स्टाफ सदस्य भारतीय असतील. यामुळे टी दिलीपसाठी पुन्हा एकदा दरवाजे उघडले. त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले. मागील कोचिंग स्टाफमधील सदस्याने पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात काम करणे ही नवीन गोष्ट नाही. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड रवी शास्त्री यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाले आणि द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतरही ते फलंदाजी प्रशिक्षक राहिले होते.
उल्लेखनीय आहे की गंभीरच्या सपोर्ट स्टाफबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता गंभीरसोबत सपोर्ट स्टाफमध्ये कोण दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
आग, आक्रमकता आणि प्रेम…, गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या ‘डीजे’ने काय म्हटले?
ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये फूट? मिचेल स्टार्कची नाराजी; अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाशी संबंधित प्रकरण
जडेजाच्या जागी टीम इंडियात या खेळाडूची वर्णी? झिम्बाब्वेविरुद्ध दाखवली अप्रतिम कामगिरी