आयपीएल 2025 च्या 66 व्या सामन्यात, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने होते. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्सने जिंकला. दिल्लीसाठी या हंगामातील हा शेवटचा सामना होता, ज्यात त्यांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने 3 चेंडू शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले.
207 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून समीर रिझवीने शानदार कामगिरी केली. त्याने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याच्या खेळीने दिल्ली कॅपिटल्सने एकतर्फी सामना जिंकला. त्याने त्याच्या डावात 3 चौकार व 5 षटकार मारले.
Cheeky ???? Classy
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2025
Sameer Rizvi and Karun Nair with pressure releasing maximums in the chase ????????
Updates ▶ https://t.co/k6WP8zBwzL #TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/ei8uDkkcdo
????????????????-???????????????? ???????????? ???????????????????????????????? ????♂️
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2025
A high-quality innings to close it out in style ✌️@DelhiCapitals sign off from this season in a ???????????????????????????? fashion ????
Updates ▶ https://t.co/k6WP8zBwzL #TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/3qgtrlWDDj
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाबची सुरुवात खराब झाली, पण जोश इंग्लिस आणि प्रभसिमरनने दुसऱ्या विकेटसाठी 47 धावा जोडल्या. विप्राज निगमने दोघांनाही बाद करत सामन्यात दिल्लीला परत आणले. कर्णधार श्रेयस अय्यरने 53 धावांची झुंजार खेळी केली, तर शेवटी मार्कस स्टोइनिसने 16 चेंडूत नाबाद 41 धावा करत पंजाबला 206 धावांपर्यंत नेले. दिल्लीकडून मुस्तफिजूर रहमानने 3 बळी घेतले.
प्रत्युत्तरात, दिल्लीने राहुल-डु प्लेसिसच्या 55 धावांच्या भागीदारीने सुरुवात केली. नंतर समीर रिझवी (25 चेंडूत नाबाद 58) आणि करुण नायर (44) यांच्या भागीदारीने सामन्याचे पारडे दिल्लीकडे झुकवले. शेवटच्या दोन षटकांत 22 धावांची गरज असताना स्टब्स आणि रिझवीने संयमी खेळी करत दिल्लीला विजयी केले.






