दिल्ली प्रीमियर लीगच्या उद्घाटन हंगामाचा उत्साह कायम असून स्पर्धेच्या 15 व्या सामन्यात चाहत्यांना चौकार आणि षटकारांची धूम पाहायला मिळाली. या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने पुरानी दिल्ली 6 संघाचा 88 धावांनी पराभव करत चौथा विजय नोंदवला. प्रथम खेळताना दक्षिण दिल्ली संघाने 20 षटकांत 235/3 धावा केल्या. प्रत्युत्तर पुरानी दिल्ली संपूर्ण षटके खेळून केवळ 147/9 धावा करू शकली. डीपीएलच्या (DPL) इतिहासातील पहिले शतक झळकावणाऱ्या दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सच्या प्रियांश आर्यला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकल्यानंतर पुरानी दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो की संघासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रियांश आर्य आणि सार्थक राय या सलामीच्या जोडीने दक्षिण दिल्ली सुपरस्टार्ससाठी शतकी भागीदारी केली. सार्थकने 37 चेंडूत 49 धावांची खेळी खेळली. यानंतर धडाकेबाज अर्धशतक झळकावून कर्णधार आयुष बदोनीने धमाका केला. बदोनीने 20 चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 56 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याचवेळी डावाच्या सुरुवातीला आलेल्या प्रियांशने शेवटपर्यंत जबाबदारी सांभाळली आणि आपले शतक पूर्ण केले. त्याने 55 चेंडूत नऊ चौकार आणि सात षटकारांसह 107 धावांची नाबाद खेळी खेळली. तेजस्वी दहियानेही 8 चेंडूत 18 धावांची आक्रमक खेळी खेळली. तर गोलंदाजीत पुरानी दिल्लीकडून राजकुमार यादवने सर्वाधिक दोन बळी घेतले.
South Delhi are the 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐬𝐭𝐚𝐫𝐳 of the night 🤩👏
Brilliant batting, jaw-dropping bowling & full paisa vasool entertainment 🎬🥳#AdaniDPLT20 #AdaniDelhiPremierLeagueT20 #DilliKiDahaad @JioCinema @Sports18 @delhi_cricket pic.twitter.com/fdQVHZgLNC
— Delhi Premier League T20 (@DelhiPLT20) August 26, 2024
लक्ष्याचा पाठलाग करताना पुरानी दिल्लीला पहिला धक्का अर्पित राणाच्या रूपाने बसला. तो 16 चेंडूत 29 धावा करून 43 धावांवर बाद झाला. केशव दलाल 15 धावा करून बाद झाला, तर कर्णधार ललित यादवला खातेही उघडता आले नाही. अर्णव बग्गाने सर्वाधिक 36 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी वंश बेदीने देखील 12 चेंडूत 27 धावा केल्या. दक्षिण दिल्लीच्या गोलंदजासमोर पुरानी दिल्लीच्या एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. पुरानी दिल्लीचा संघ लक्ष्यापासून दूरच राहिला. दक्षिण दिल्लीकडून दिग्वेश राठीने सर्वाधिक तीन बळी घेतल्या.
हेही वाचा-
“पराभवासाठी प्रशिक्षक आणि कर्णधार जबाबदार”, पीसीबी अध्यक्षांचा मोठा आरोप
Duleep Trophy 2024: रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज स्पर्धेतून बाहेर; मोठे कारण समोर
गांगुली-धोनी नाही तर, हे दोन दिग्गज आवडीचे कर्णधार; स्टार क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य