भारताकडून खेळताना तब्बल 16 वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या सुनिल गावसकरांनी मराठी चित्रपटातही काम केले आहे.
1980 साली गावसकरांनी क्रिकेटमध्ये सक्रिय असतात ‘सावली प्रेमाची’ या चित्रपटात काम केले होते. तसेच त्यांनी ‘झकोळ’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.
आपल्या क्रिकेटच्या कौशल्यांबरोबरच त्यांना अभिनय आणि गायनातही पारंगत होते. सुनिल गावसकरांनी ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला’ हे गाणेही गायले होते.
सुनिल गावसकर यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवले होते. आपल्या शैलीदार फलंदाजीने क्रिकट रसिकांना तृप्त करणाऱ्या सुनिल गावसकरांनी अभिनय आणि गायनानेही आपल्या चाहत्यांना तृप्त केले आहे.
1988 साली नसरुद्दीन शहा प्रमुख भुमिकेत असलेल्या ‘मालामाल’ या चित्रपटातही सुनिल गावसकर यांनी काम केले आहे.
सुनिल गावसकरांची क्रिकेट कारकिर्द-
सुनिल गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 1917 साली पदार्पण केले होते. त्यांनी 125 कसोटी सामन्यात 10,122 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 34 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे.
तर 108 एकदिवसीय सामन्यात 3092 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्य 34 शतके करणाऱ्या गावसकरांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र एकच शतक करता आले आहे. तसेच यामध्ये 27 अर्धशतकांचा समावेश आहे.
खास लेख-
भारताच्या आजी- माजी क्रिकेटपटूंमध्ये हे ५ खेळाडू पाळतात अंधश्रद्धा
आपल्या गोलंदाजीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच
करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू