---Advertisement---

GT vs PBKS: ‘हा’ ठरला पंजाबच्या विजयाचा टर्निंग पॉईंट

On: बुधवार, मार्च 26, 2025 7:55 AM
---Advertisement---

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव करत हंगामाची विजयी सुरुवात केली. या सामन्यात, पंजाब किंग्जने पहिल्या डावात खेळताना 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला 232 धावाच करता आल्या. पंजाबच्या विजयात कर्णधार श्रेयस अय्यर चमकला, त्याने 97 धावांची तुफानी खेळी केली. तर या सामन्यात विजय कुमार वैशाख हा पंजाब किंग्जचा ‘साइलेंट’ हिरो म्हणून उदयास आला.

इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या विजयकुमार वैशाखने सामन्यात मोठा इम्पॅक्ट टाकला. जरी त्याला विकेट मिळली नसली तरी त्याने 3 षटकात 28 धावा देत कसुन गोलंदाजी केली, त्याच्या या स्पेलमुळे सामना फिरला.

तत्तपूर्वी, पंजाब किंग्जने कर्णधार श्रेयस अय्यर (97 धावा) शशांक सिंग (44 धावा) तर प्रियांश आर्य (47 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर मर्यादित 20 षटकात 243 धावा केल्या, लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी वेगवान सुरुवात करुन दिली, पॉवरप्लेमध्ये साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी संघाचा स्कोअर 60 च्या पुढे नेला, पण 14 चेंडूत 33 धावा करून गिल बाद झाला. त्यानंतर जोस बटलरने आणि साई सुदर्शनसोबत 84 धावांची भागीदारी केली. पण 41 चेंडूत 74 धावा करून सुदर्शन बाद झाला.

जोस बटलरने 33 चेंडूत 54 धावा केल्या, पण संघाला त्याची सर्वात जास्त गरज असताना तो बाद झाला. शेरफेन रदरफोर्ड एका टोकाला धरून होता पण विजयकुमार वैशाखच्या हळू चेंडूंमुळे तो अडचणीत आला. खऱ्या अर्थाने, जेव्हा विजयकुमार वैशाखने रुदरफोर्डसारख्या धोकादायक फलंदाजाविरुद्ध 17 व्या षटकात फक्त 5 धावा दिल्या तेव्हा सामन्याचे चित्र बदलले. ज्यामुळे सामना पंजाबच्या पारड्यात झुकले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---