---Advertisement---

एशिया कपवर टाकला जाईल का बहिष्कार? 39 वर्षांपूर्वीही भारताने दिला होता खेळण्यास नकार

On: गुरूवार, ऑगस्ट 14, 2025 9:03 AM
---Advertisement---

पहिले देश, मग खेळ असं ठामपणे सांगत माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी एशिया कप 2025 मध्ये भारताने खेळू नये, असा सल्ला दिला आहे. त्यांचं मत आहे की, “सीमेवर तणाव असताना आणि भारत-पाकिस्तानमध्ये वाद सुरू असताना क्रिकेट खेळणं योग्य नाही. जोपर्यंत मोठे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत देश सर्वात महत्त्वाचा आहे.”

हरभजन सध्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) स्पर्धेत खेळत होते. तिथं इंडिया चॅम्पियन्स संघाने ग्रुप स्टेज आणि सेमीफायनल दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध खेळण्यास नकार दिला. या निर्णयाला शिखर धवन, युवराज सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना आणि युसुफ पठाण यांचा पाठिंबा होता. हा निर्णय पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आला.

एशिया कप स्पर्धेची सुरुवात 1984 साली झाली आणि पहिल्याच सिझनमध्ये भारत विजेता ठरला. 2016 आणि 2022 मध्ये ही स्पर्धा T20 फॉरमॅट मध्ये झाली. भारताने आतापर्यंत एकूण 8 वेळा, तर श्रीलंकेने 6 वेळा विजेतेपद मिळवलं आहे. 2023 मध्ये रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा किताब आपल्या नावावर केला.

पूर्वीही एशिया कपमध्ये या टीम्सने बहिष्कार टाकला-
1986 मध्ये भारताने खेळण्यास नकार दिला.
1990–91 मध्ये पाकिस्तानने भारतातील स्पर्धेत भाग घेतला नाही.
1993 मध्ये भारत-पाकिस्तान तणावामुळे स्पर्धा रद्द झाली.

1990–91 च्या एशिया कपच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला 7 विकेट्स ने हरवून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---