---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर आयसीसी रँकिंगमध्ये उलथापालथ, रोहित शर्माची उंच भरारी

---Advertisement---

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद जिंकले. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात केलेल्या शानदार कामगिरीबद्दल भारतीय कर्णधाराला आता मोठे बक्षीस मिळाले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत रोहित शर्माने मोठी प्रगती केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात 76 धावांची शानदार खेळी करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्माने आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रोहितने दोन स्थानांनी प्रगती करत तिसरे स्थान पटकावले आहे. रोहितने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज म्हणून विराट कोहली आणि हेनरिक क्लासेन यांना मागे टाकले आहे. रोहितचे रेटिंग 756 पर्यंत वाढले आहे. क्लासेन एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे तर विराट पाचव्या स्थानावर घसरला आहे.

भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल अव्वल स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 784 आहे. पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 721 रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. आयर्लंडचा हॅरी टेक्टर एका स्थानाने घसरून 7 व्या क्रमांकावर आला आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा श्रेयस अय्यर आठव्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा चरिथ असलंका 694 रेटिंगसह नवव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान 676 रेटिंग गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे.

भारताच्या 4 फलंदाजांचा टॉप-10 फलंदाजांच्या क्रमवारीत समावेश आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या धडाकेबाज फलंदाज रचिन रवींद्रने 14 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. रचिन आता 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा केएल राहुल एका स्थानाने घसरून 16व्या स्थानावर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---