आगामी टी20 विश्वचषकाची (T20 World Cup) सुरुवात येत्या 2 जूनपासून होणार आहे. टी20 विश्वचषकाचा हा 9 वा हंगाम आहे. यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात खेळला जाणार आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात 20 संघ सहभागी झाले आहेत. या टी20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. त्यामध्ये सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि फायनल सामना खेळला जाणार आहे.
तत्पूर्वी सर्व संघांची टी20 आंतरराष्ट्रीय रँकिंग (ICC t20 Ranking) अपडेट झाली आहे. टी20 विश्वचषकाच्या सुरुवातीपूर्वी भारतीय पुरुष संघ टी20 आंतराष्ट्रीय रँकिंगमध्ये शीर्ष स्थानी आहे. भारतीय संघाचं रेटींग 264 आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघ आहे. ऑस्ट्रेलियाचे रेटिंग 257 आहे. तिसऱ्या स्थानी 2022 टी20 विश्वचषक विजेता इंग्लंड आहे. चौथ्या स्थानी टी20 विश्वचषकाचा 2 वेळा मानकरी ठरलेला संघ वेस्ट इंडिज आहे.
टी20 विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडीजनं दक्षिण अफ्रीकेला 3 टी20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी मात दिली आणि आयसीसी टी20 रँकिंगमध्ये चौथे स्थान पटकावले. दक्षिण अफ्रीकेचा संघ आयसीसी टी20 रँकिंगमध्ये 7 व्या स्थानी घसरला. टी20 विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण अफ्रीका या दोन संघांमध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. त्यामध्ये पहिला सामना वेस्ट इंडीजनं 28 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं दक्षिण अफ्रीकेला 16 धावांनी मात दिली आणि 3 टी20 सामन्यांची मालिका जिंकण्याची आशा संपुष्टात आणली.
तिसऱ्या टी20 सामन्यातही दक्षिण अफ्रिकेचा कमबॅक होऊ शकला नाही. वेस्ट इंडीजनं तिसऱ्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला आणि आयसीसी टी20 रँकिंगमध्ये मुसंडी मारली. आयसीसी टी20 रँकिंगच्या टाॅप-5 संघांमध्ये 250 रेटिंगसह पाचवा संघ न्यूझीलँड आहे. तर पाकिस्तान संघ आयसीसी टी20 रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी आहे. टी20 रँकिंगच्या टाॅप-10 मध्ये शेवटचे तीन संघ श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगानिस्तान आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट कोहली-यशस्वी जयस्वाल’ सलामी मोर्चा सांभाळावा रोहित चाैथ्या क्रमांकावर फीट विश्वचषकापूर्वी ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला
टी20 विश्वचषकापूर्वी रिषभ पंतचा व्हिडीओ व्हायरल म्हणाला, “भारतीय संघासाठी पुन्हा उभं राहणं…” पाहा व्हिडीओटी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासोबत ‘हा’ दिग्गज खेळाडू झाला सहभागी