भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मधील दुसऱ्या कसोटीला आजपासून (6 डिसेंबर) सुरूवात झाली आहे. उभय संघांमधला हा सामना दिवस-रात्र खेळवला जाणार असून तो ॲडलेड ओव्हलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू हातावर काळ्या पट्टी बांधून खेळत आहेत. त्यामुळे त्यामागचे कारण जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली. आता यामागचे कारण समोर आले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू फिलिप ह्युजेस आणि इयान रेडपाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हातात काळ्या पट्या घालून मैदानात उतरले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू फिलिप ह्यूजचा क्रिकेटच्या मैदानावर अपघात होऊन मृत्यू झाला. 25 नोव्हेंबर 2014 रोजी, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी शेफिल्ड शील्ड सामना खेळत असताना शॉन ॲबॉटने टाकलेल्या बाउन्सरने ह्यूजच्या मानेवर मार लागला. यानंतर तो जमिनीवर पडला आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण क्रिकेट जगताला या अपघाताने दु:ख झाले होते. त्यावेळी अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या जोडीदाराच्या निधनाने अत्यंत दु:खी दिसले. आता 10 वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.
सलामीवीर इयान रेडपाथचा यांचा या महिन्याच्या 1 तारखेला मृत्यू झाला. त्यांचे वय 83 वर्षे होते. रेडपाथ हे 1960 आणि 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे अविभाज्य भाग होते. ते त्यांच्या भक्कम आणि विश्वासार्ह फलंदाजीसाठी ओळखले जात असे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 66 कसोटी सामन्यांमध्ये 4737 धावा केल्या. ज्यात 8 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा-
IND vs AUS; गुलाबी चेंडू टीम इंडियासाठी डोकेदुखी, पाहा आतापर्यंतचा रेकॉर्ड!
6 डिसेंबरला जन्मलेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, जसप्रीत बुमराहसह अनेक दिग्गजांचा समावेश
IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या तीन बदलांसह भारतीय संघ मैदानात