भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. या ठिकाणी टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्धची पहिली कसोटी जिंकताच एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला जाईल. जो गेल्या 92 वर्षांत घडला नाही.
भारतीय क्रिकेट संघाने 1932 मध्ये कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून टीम इंडियाने 579 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 178 सामने जिंकले आणि 178 हरले, तर एकूण 222 सामने अनिर्णित राहिले. टीम इंडियाने बांग्लादेशला पहिल्या कसोटीत पराभूत केल्यास संघाच्या नावावर एक विशेष विक्रम नोंदवला जाईल.
जर भारतीय क्रिकेट संघ बांग्लादेशला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर हा भारताचा कसोटीतील 179 वा विजय असेल. टीम इंडिया 1932 नंतर प्रथमच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पराभवाचा आकडा पार करेल. टीम इंडिया 92 वर्षांनंतर ही कामगिरी करेल. यासह टीम इंडिया कसोटीत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीला (179 विजय) चौथ्या स्थानावर पोहोचेल.
बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत. दोन सामने अनिर्णित राहिले. बांग्लादेशला अजूनही भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयाची प्रतीक्षा आहे.
कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आकाश, जसप्रीत बुमराह, यश दयाल
बांग्लादेश
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद. खालिद अहमद, झेकर अली
हेही वाचा-
गोलंदाजी प्रशिक्षक बनण्याच्या बातमीनं भावूक झाला होता मोर्ने मॉर्केल, भारतीय संघात येताच केला मोठा खुलासा
भारत पाकिस्तानचा विक्रम मोडणार! बांग्लादेश कसोटी मालिकेत मोठी संधी
कोण आहे दुलीप ट्रॉफीमध्ये पहिलं शतक झळकावणारा प्रथम सिंह? सुरेश रैनाशी आहे खास नातं