---Advertisement---

लॉर्ड्स टेस्टमधील पराभवानंतर संतापला शुभमन गिल; म्हणाला…

On: मंगळवार, जुलै 15, 2025 7:01 AM
---Advertisement---

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात भारतीय संघ 170 धावा करून सर्वबाद झाला. अर्थात, या पराभवानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिल खूप निराश दिसत होता. या पराभवासाठी त्याने फलंदाजांना जबाबदार धरले आहे.

सामन्यानंतर शुभमन गिल म्हणाला की, “चौथ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या एका तासात आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागली. तो म्हणाला की गोष्टी खूप लवकर बदलल्या. मला वाटतं की शेवटच्या एका तासात आपण अधिक चांगल्या प्रकारे खेळू शकलो असतो. आज सकाळीही आमचा संघ एका योजनेसह खेळायला आला. आम्हाला 50 धावांची भागीदारी अपेक्षित होती. जर वरच्या फळीकडून 50 धावांची भागीदारी झाली असती तर आमच्यासाठी गोष्टी सोप्या झाल्या असत्या. बऱ्याचदा मालिकेचे स्कोअरकार्ड तुम्ही किती चांगले खेळलात हे सांगू शकत नाहीत. मला वाटतं आम्ही चांगले क्रिकेट खेळलो.”

भारतीय कर्णधाराने असेही म्हटले की, “मला या संघाचा अभिमान आहे. आमच्या संघाने शानदार खेळ केला. इंग्लंडने भारतीय फलंदाजांविरुद्ध आक्रमक वृत्ती दाखवली. यानंतर, जेव्हा त्याला जसप्रीत बुमराह पुढील कसोटी सामन्यात खेळण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले की तुम्हाला लवकरच याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारत विरूद्ध इंग्लंड दोघांनीही त्यांच्या पहिल्या डावात 387-387 धावा केल्या होत्या. यानंतर, इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 192 धावांवर सर्वबाद झाला. भारताला 193 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारत 170 धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सने बॅटींग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये शानदार कामगिरी केली, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---