मुंबई इंडियन्सने गुरुवारी त्यांचे अँथम सॉंग रिलीज केले. ‘मैं नहीं तो कौन बे’ फेम श्रुती तावडेने हे गाणे गायले आहे, तर बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ देखील त्यात दिसत आहे. या गाण्यात जॅकी श्रॉफ रोहित शर्माची एन्ट्री भव्य पद्धतीने करताना दिसत आहे. या गाण्याची मुख्य ओळ आहे, ‘प्ले लाइक मुंबई,’. म्हणजे मुंबईसारखे खेळायचे.
मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2025 मध्ये आपला पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळेल. रविवारी होणारा हा सामना डबल हेडरचा दुसरा सामना असेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू होईल. आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी, गुरुवार, 20 मार्च रोजी संघाने त्यांचे अँथम सॉंग लाँच केले.
हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. संघाने अधिकृतपणे कळवले आहे की सध्या टीम इंडियाच्या टी 20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात हार्दिकच्या जागी कर्णधारपद भूषवेल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्स सीएसकेसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. दोघांनीही प्रत्येकी 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. गेल्या हंगामात (2024) संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले होते.
सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, बेव्हॉन जेकब्स, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंज, कृष्णन श्रीजित, हार्दिक पंड्या, नमन धीर, राज बावा, विघ्नेश पुथुर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अश्विनी कुमार, रीस टोपली, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान.






