भारतीय संघाचा स्टार फलंदाज केदार जाधवने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2020 मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यावेळी केदार जाधव न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. यापूर्वी तो 2019 च्या विश्वचषक भारतीय संघाचा भाग होता. दरम्यान, आता केदार जाधवने निवृत्तीची घोषणा केली आहे. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
याबातमीद्वारे मराठमोळ्या केदार जाधवच्या आयपीएलमधील कारकीर्दवर उजाळा टाकूयात
केदार जाधवने 2010 साली आयपीएलमध्ये पदापर्ण केले होते. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपीटल्स) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळला आहे. केदार जाधवने आयपीएलमध्ये 93 सामने खेळला आहे. ज्यामध्ये 1196 धावा केल्या आहेत. ज्यात 101 चाैकार तर 40 षटकारांचा समावेश आहे.
केदार जाधवने 2018 साली चेन्नई सुपर किंग्जच्या कमबॅक सीझन मध्ये त्याने पहिल्या सामन्यात मुंबई विरुद्ध शेवटच्या ओव्हर मध्ये षटकार आणि चाैकार खेचत विजय मिळवून दिला होता. त्यानंतर केदार 2018 च्या आयपीएल हंगामातून दुखापतीमुळे बाहेर पडला होता. आजही त्याचे चाहते ही 24 धावाची खेळी विसरले नाहीत.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी केदारने 2017 साली दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध मॅच विनिमग खेळी खेळली होती. त्याने 37 चेंडूत 69 धावा केल्या होत्या. अशक्य वाटणाऱ्या सामन्यात केदार विस्फोटक फलंदाजी करत विजय मिळवला होता.
Thank you all For your love and support throughout my Career from 1500 hrs
Consider me as retired from all forms of cricket— IamKedar (@JadhavKedar) June 3, 2024
केदार जाधवने एमएस धोनीच्या शैलीत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. 2020 मध्ये, एमएस धोनीने 15 ऑगस्ट रोजी क्रिकेटला अलविदा केला. त्याने इंस्टाग्रामवर दोन ओळींचे निवेदन लिहिले. धोनीने लिहिले होते की, तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार, मला संध्याकाळी 7.29 पासून निवृत्त समजा. यादरम्यान धोनीने त्याच्या कारकिर्दीतील छायाचित्रांचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याचे आवडते गाणे देखील समाविष्ट होते. त्याचवेळी केदार जाधवने देखील इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. केदारने व्हिडिओ ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है’ हे गाणं निवडले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
मराठमोळ्या केदार जाधवची पाहा कशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द!
न्यूयॉर्कमध्ये श्रीलंकन संघ हैराण! कर्णधार हसरंगाने मांडली व्यथा
रोहित शर्माला ‘या’ दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी!