टीम इंडियाने 2024 च्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. बार्बाडोसच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघ चॅम्पियन झाला. 2024 चा टी20 विश्वचषक जिंकणे ही टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी खूप आनंदाची बाब होती. कारण याच्या काही महिन्यांपूर्वी संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद अंतिम फेरीत हरवून गमावले होते. टी20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भाकित केले होते की, रोहित शर्मा बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवेल. आता त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबाबतही मोठी भविष्यवाणी केली आहे.
टीम इंडियाने 2024 टी20 विश्वचषकाच्या यशासह 11 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. आता जय शाहने पुन्हा एकदा वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफींमध्ये तिरंगा फडकवण्याची गोष्ट केली आहे. ते म्हणाले की जर आम्हाला 1.4 अब्ज लोकांचा आशीर्वाद असेल तर आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही अशीच कामगिरी करू.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना जय शाह म्हणाले, “जसे मी राजकोटमध्ये सांगितले की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवेल, आता येथे मी म्हणतो की 1.4 अब्ज लोकांचे आशीर्वाद मिळाल्यास आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्येही असेच करू.
खरे तरं, पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करत आहे. जी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवली जाईल. आता अश्या स्थितीत प्रश्न उपस्थित होत आहे की टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही? एकीकडे पाकिस्तान या स्पर्धेच्या यजमानपदावर ठाम आहे. दुसरीकडे, पाकिस्तान दौऱ्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणताही स्पष्ट संदेश आलेला नाही. 2023 च्या आशिया चषकाप्रमाणे ही स्पर्धा हायर्बिड पद्धतीने खेळवली जाऊ शकते असे मानले जाते. मात्र ही स्पर्धा कशी खेळवली जाईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा-
अफगाणिस्तानला चॅम्पियन बनवणारा भारतीय ‘गुरू’ सापडला, टीम इंडिया सोबतही 7 वर्षांचा प्रवास
‘जर जास्त पैसे मिळाले…’, राहुल द्रविडने सांगितले त्याच्या बायोपिकमध्ये कोणी भूमिका करावी?
रोहित-कोहलीसोबत यशस्वीलाही मिळाला पुरस्कार, जाणून घ्या यादीत कोणा-कोणाचा समावेश