आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांग्लादेशविरुद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. भारत आणि पाकिस्तानचे संघ 23 फेब्रुवारी रोजी आमनेसामने येतील. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत-पाकिस्तान सामन्यावर आहेत. दरम्यान, दोन्ही देशांतील खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता पाकिस्तानचा उपकर्णधार सलमान अली आगाने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचा उपकर्णधार सलमान अली आगाला असे वाटते की भारताविरुद्ध जिंकण्यापेक्षा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. सलमान अली आगाने पीसीबी पॉडकास्टमध्ये म्हटले की, जर आमचा संघ भारताकडून हरतो, पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरतो तर त्याला काही अर्थ नाही. त्याच वेळी, जर आपण भारताकडून हरलो पण जेतेपद जिंकण्यात यशस्वी झालो तर ती एक मोठी कामगिरी असेल. खरंतर, पाकिस्तान या स्पर्धेत गतविजेता म्हणून प्रवेश करेल. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवून विजेतेपद पटकावले.
सलमान अली आगा पुढे म्हणाला, “भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मोठा आहे, परंतु आमच्यासाठी ट्रॉफी जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. आमचे ध्येय स्पर्धेत चांगली कामगिरी करणे आणि ट्रॉफी जिंकणे आहे. मी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खूप उत्सुक आहे. पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे, ते खास आहे. मी लाहोरचा असल्याने, माझ्या गावी ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली तर माझे स्वप्न पूर्ण होईल. आपल्या पाकिस्तान संघात ट्रॉफी जिंकण्याची ताकद आहे”.
हेही वाचा-
धोनीवर हरभजनने केलेला आरोप तर्कहीन? व्हिडिओमुळे खरी बाजू समोर
रोहित शर्माची विसरभोळेपणाची सवय कायम! दुबईत टीम इंडियाच्या आगमनाचा व्हिडिओ चर्चेत
वादग्रस्त निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव? दिल्ली कॅपिटल्सचा रोमांचक विजय






