---Advertisement---

अफाट साैंदर्य पडलं महागात, जलतरणपटूला सुंदर असल्याकारणानं ऑलिम्पिमधून पडावं लागलं बाहेर

On: शुक्रवार, ऑगस्ट 9, 2024 8:33 AM
---Advertisement---

यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा बऱ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या खेळाच्या महाकुंभात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिला खेळाडूला पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी पाठवण्यात आले कारण ती खूपच सुंदर होती. होय, तुम्ही बरोबर वाचत आहात, हे घडले आहे. 20 वर्षीय पॅराग्वेयन जलतरणपटू लुआना अलोन्सो हिला ऑलिम्पिक व्हिलेजमधून तिच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या काही खेळाडूंनी लुआनाच्या सौंदर्याबाबत आयोजनाकडे तक्रार केली होती. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या खेळाडूंनी सांगितले की, लुआना इतकी सुंदर आहे की त्यांना खेळावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते. अशी तक्रार दाखल केल्यानंतर जेव्हा अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली तेव्हा त्यांनीही या महिला खेळाडूचे सौंदर्य लक्ष वेधून घेणारे असल्याचे म्हटले आहे. पराग्वेच्या खेळाडूंसोबत उपस्थित अधिकाऱ्यांना असे वाटले की, लुआनाच्या सौंदर्याचा खेळाडूंच्या खेळावर परिणाम होऊ शकतो. जर खेळाडूंनी खेळावर लक्ष केंद्रित केले नाही तर पदक जिंकण्याची देशाची आशा पूर्ण होणार नाही. त्यामुळे लुआना हिला मायदेशी पाठवण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Luana Alonso (@luanalonsom)

दरम्यान, अनेक बातम्यामध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, लुआनाचे कपडे आणि वागणूकीमुळे संघातील वातावरण बिघडत होते. त्यामुळे तिला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, लुआनाला मायदेशी पाठवण्यात कारण तिचे अफाट सौंदर्य आहे. तिच्या सौंदर्याने तिच्याच संघातील उर्वरित खेळाडूंचे लक्ष विचलित करत असल्याचे कारण देण्यात आलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर, लुआनाने पोहणे पूर्णपणे निवृत्ती जाहीर केली आणि तिला मिळालेल्या समर्थन आणि प्रेमाबद्दल तिच्या समर्थकांचे आणि देशाचे आभार मानले. तथापि, तिने अद्याप ऑलिम्पिकमधून बाहेर पडायला सांगितलेल्या विषयावर भाष्य केलेले नाही.

हेही वाचा-

हक्काचं ‘सुवर्ण’ थोडक्यात हुकलं, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरजची राैप्य पदकाची कमाई
कुस्तीत भारताच्या पदरी पुन्हा निराशा, स्टार पैलवानाचा सेमीफायनलमध्ये पराभव
विनेशला पदक मिळणार की नाही? पॅरिसमध्ये होणार सुनावणी, कोर्टानं अपील स्वीकारलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---