---Advertisement---

रिंकू सिंगने पुन्हा मन जिंकले, वडिलांना दिला खास भेट, सोशल मीडियावर वाह.! वाह..!!

On: मंगळवार, जानेवारी 21, 2025 8:54 AM
---Advertisement---

भारतीय फलंदाज रिंकू सिंग सध्या चर्चेत आहे. अलिकडेच मच्छलीशहरमधील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज आणि रिंकू सिंग यांच्यातील साखरपुड्याची बातमी आली होती. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी रिंकू सिंगची भारतीय संघात निवड झाली आहे. ही मालिका २२ जानेवारीपासून सुरू होईल. मालिकेपूर्वी, रिंकूने त्याच्या वडिलांना एक स्पोर्ट्स बाईक भेट दिली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिंकूचे वडील खानचंद सिंग एलपीजी सिलिंडर पोहोचवण्याचे काम करायचे. रिंकू सिंग यशस्वी क्रिकेटपटू झाल्यानंतरही त्याचे वडील त्यांच्या कामावर जातात. रिंकूने त्याच्या वडिलांना कावासाकी निन्जा 400 स्पोर्ट्स बाईक भेट दिली आहे. या बाईकची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये, रिंकूचे वडील बाईक चालवताना आणि त्यावर कामावर जाताना दिसत आहेत.

रिंकू सिंगने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 2 कसोटी आणि 30 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 2 एकदिवसीय डावांमध्ये 27.50 च्या सरासरीने आणि 134.14 च्या स्ट्राईक रेटने 55 धावा केल्या आहेत. रिंकू सिंगने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या 22 डावांमध्ये 507 धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 3 अर्धशतकेही झळकावली आहेत.

इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)

भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी20 सामना: 22 जानेवारी – ईडन गार्डन्स, कोलकाता
दुसरा टी20 सामना: 25 जानेवारी – एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
तिसरा टी20 सामना: 28 जानेवारी – सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट
चौथा टी20 सामना: 31जानेवारी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पाचवा टी20 सामना: 2 फेब्रुवारी – वानखेडे स्टेडियम, मुंबई

हेही वाचा-

आखेर 12 वर्षांनंतर विराट कोहली रणजी ट्राॅफीत खेळणार, मुख्य प्रशिक्षकांनी केली पुष्टी
IND VS ENG; टी20 मालिकेपूर्वी संघाने घेतला मोठा निर्णय, हा खेळाडू यष्टीरक्षण करणार नाही
IPL 2025; 7 संघांच्या कर्णधाराची घोषणा! आरसीबी, केकेआरसह दिल्लीही कर्णधाराच्या शोधात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---