भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाशी संबंधित अफवांवर अखेर खुलासा केला आहे. शमी आणि सानिया लवकरच लग्न करणार असल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यासोबतच त्याचा फोटोही एडिट करून ऑनलाइन शेअर करण्यात आला होता. यावर अखेर शमीच्या रागाचा भडका उडाला आहे.
मोहम्मद शमी शुंभाकर मिश्राच्या युट्यूब शो मध्ये बोलताना म्हणाला, लोक बऱ्याचदा या सारख्या गोष्टी मीम्स म्हणून पाहतात. परंतु हे एका व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाच्या संबधित विषय आहे. शमी म्हणाला, या मीम्स लोकांच्या वैयक्तिक जीवनावर जोडला जावू शकतो. त्यामुळे तुम्हाला विचारपूर्वक अश्या गोष्टी करायला पाहिजे. ज्या लोकांचे पेज व्हेरिफाईड केलेले नाहीत तेच लोक असे बोलू शकतात. मी तुम्हाला आव्हान देतो की तुमच्यात हिम्मत असेल तर व्हेरिफाईड पेजवरून अशी पोस्ट शेअर करून दाखवा.”
शमी म्हणतो की, दुसऱ्या व्यक्तीला खड्ड्यात ढकलणे सोपे आहे, पण त्या लोकांनी स्वत: यश मिळवण्याचा विचार केला पाहिजे. शमी पुढे म्हणाला, “इतरांचे पाय खेचण्यात या लोकांना जितकी मजा येते, तितकीच मी त्यांना सांगू इच्छितो की, चार लोकांचे भविष्य त्यांच्या कुटुंबाचा आधार बनून सुधारा. जर त्यांनी इतर कोणाला मदत केली तर मी ते मान्य करेन. तू एक चांगला माणूस आहेस.”
टेनिस स्टार सानिया मिर्झाने यावर्षी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला घटस्फोट दिला होता. मोहम्मद शमीसोबतच्या तिच्या लग्नाच्या अफवा पसरू लागल्यावर सानियाच्या वडिलांचे वक्तव्य समोर आले. सानियाच्या वडिलांनी हे सर्व वृत्त खोडसाळपणे फेटाळून लावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी या खेळाडूनं दिला चक्क आपल्या बोटाचा बळी!
एकेकाळी पुढचा ‘सचिन’ म्हटलं जायचं, आता 24व्या वर्षीच संपलं या खेळाडूचं करिअर!
हार्दिक पांड्याचं भविष्य धोक्यात! टीम इंडिया पाठोपाठ मुंबई इंडियन्सचंही कर्णधारपद जाणार?