---Advertisement---

खान कुटुंबीयांसाठी एका पाठोपाठ एक गूड न्यूज, ‘शतकावीर’नंतर सरफराज बनला पिता

On: मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024 10:05 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर सरफराज खानने त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे. पण ही आनंदाची बातमी क्रिकेटशी संबंधित नसून त्याच्या कुटुंबाशी संबंधित आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या सरफराज खानच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं स्वागत करण्यात आलं.

सरफराज खानची पत्नी रोमना जहूरने सोमवारी (21 ऑक्टोबर) रात्री एका लाडक्या मुलाला जन्म दिला आहे. सरफराज खान आता पिता झाला आहे. त्यामुळे नौशाद खान आजोबा तर मुशीर खान काका झाले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोमना जहूर मैदानावर सरफराज खानला सपोर्ट करताना दिसली.

सरफराज खानने सोमवारी रात्री त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये सरफराज खान आपल्या बाळाला मांडीवर घेतलेला दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘इट्स बेबी बॉय’. चाहत्यांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. 

 


न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सरफराज खानने शानदार फलंदाजी केली. जिथे त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात सरफराज खान सपशेल अपयशी ठरला होता. तर दुसऱ्या डावात त्याने शानदार खेळी केली. सरफराजने 195 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 18 चौकार आणि 3 षटकारही मारले. मात्र भारतीय संघाने हा सामना गमावला.

सरफराज यापूर्वी इराणी चषकात द्विशतक झळकावले होते. सर्फराजचा भाऊ मुशीर लखनऊमध्ये झालेल्या त्या सामन्यात अपघातामुळे खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याने द्विशतक झळकावून भावाची उणीव भरून काढली होती.

हेही वाचा-

IND VS NZ; दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, स्टार खेळाडू फिट..!
IND vs NZ: संघाला मोठा धक्का! अनुभवी खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर
ऑस्ट्रेलिया दाैऱ्यासाठी भारतीय अ संघाची घोषणा, मराठमोळ्या खेळाडूची कर्णधारपदी वर्णी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---