इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीबद्दल विधान केले आहे.
शार्दुल ठाकूरने रोहित आणि कोहलीच्या कसोटीतून निवृत्तीबद्दल रेव्हस्पोर्ट्झवरील बोरिया मजुमदारशी बोलताना म्हणाला, “अर्थातच ते आता कसोटी क्रिकेट खेळणार नाहीत. ते सध्या आमच्या संघातील सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू होते, परंतु तरीही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.” Shardul Thakur On Virat-Rohit Test Retirement
तो पुढे म्हणाला, “पण सध्याचा संघ एक तरुण आणि प्रतिभावान संघ आहे. संघात एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे, हा प्रत्येकासाठी एक आव्हानात्मक पण महत्त्वाचा दौरा असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या प्रेरणादायी खेळाडूंच्या अनुपस्थितीत, मला वाटते की सध्याचा सर्वात अनुभवी खेळाडू जड्डू (रवींद्र जडेजा) आहे. त्यामुळे एकंदरीत हा दौरा सर्वांसाठी एक मनोरंजक असणार आहे, ज्यामध्ये नवीन कर्णधारासह आपल्या सर्वांच्या खांद्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील.” INDIA TOUR ENGLAND 2025
7 मे रोजी रोहित आणि 12 मे रोजी कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दोन्ही स्टार खेळाडूंच्या अचानक निवृत्तीनंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. Rohit-virat Test Retirement
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक IND vs ENG 2025: Time Table
पहिला कसोटी सामना – 20-24 (लीड्स)
दुसरा कसोटी सामना – 2-6 जुलै (बर्मिंगहॅम)
तिसरा कसोटी सामना – 10-14 जुलै (लॉर्ड्स)
चौथा कसोटी सामना – 23-27 जुलै (मँचेस्टर)
पाचवा कसोटी सामना – 31 जुलै- 4 ऑगस्ट (द ओव्हल, लंडन)
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया! TEAM INDIA SQUAD FOR ENGLAND TOUR 2025
शुबमन गील (कर्णधार)
रिषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर)
यशस्वी जयस्वाल
केएल राहूल
साई सुदर्शन
अभिमन्यू ईश्वरन
करुण नायर
नितीश कुमार रेड्डी
रविंद्र जडेजा
ध्रुव ज्युरेल (विकेटकीपर)
वॅाशिंग्टन सुंदर
शार्दुल ठाकूर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
प्रसिद क्रिष्णा
आकाश दीप
अर्शदीप सिंग
कुलदीप यादव





