---Advertisement---

फक्त ‘त्या’ खेळाडूने कॉल केला नसता तर द्रविड कोच राहिला नसता…

---Advertisement---

यंदाचा टी20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ दोन टी20 विश्वचषक जिंकणारा तिसरा देश ठरला आहे. टी20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिल्यांदा विश्वविजेता ठरली होती. तर 17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 चा टी20 विश्वचषक भारतीय संघाने जिंकला. या दरम्यान मीडियाशी बोलताना सूर्यकुमार यादवने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पराभवानंतरचा किस्सा सांगितला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया यंदाची टी20 विश्वचषकाची ट्राॅफी उंचावली. टीम इंडियाच्या विजयात हेड कोच राहुल द्रविड यांची भूमिका असमान्य होती. या पूर्वी एकदिवसीय विश्वचषकात देखील भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला होता. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला मात देऊन ट्राॅफीवर कब्जा केला. त्यावेळी भारतीय संघाच्या शानदार कामगिरीत राहुल द्रविड यांची भूमिका खूप महत्वाची होती. पण अंतिम सामन्यातील पराभावामुळे त्यांनी मुख्य प्रशिक्षक पदाचा राजिनामा देण्याचा निर्णय घेतला होता. पण रोहित शर्मा आणि जय शहा यांच्या विनवणी मुळे राहुल द्रविड टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेसाठी संघाकडून हेड कोचची भूमिका स्विकारली.

या संदर्भात मीडियाशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला “शेवटी, द्रविड आला आणि रोहितचे आभार मानले आणि म्हणाला, ‘धन्यवाद, रोहित, नोव्हेंबरमधील त्या फोन कॉलसाठी’ कारण त्याला 50 षटकांच्या विश्वचषक पराभवानंतर पुढे जायचे नव्हते पण रोहित आणि जय सरांनी त्याला  राहण्यासाठी पटवले.”.

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली होती. सेमी फायनलसह भारतीय संघ अपराजित होता. पण अंतिम सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. पण टीम इंडियाने टी20 विश्वचषकात जोरदार कमबॅक संपूर्णा विश्वचषकात अपराजित राहून ट्राॅफी आपल्या नावे केली. या विजयासह भरतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे.

महत्तवाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या 15 जणांच्या सपोर्ट स्टाफमध्ये नक्की आहे तरी कोण-कोण? पाहा संपुर्ण यादी…
टीम इंडियाला मिळणाऱ्या 125 कोटींची अशी होणार विभागणी, रोहितला 5 कोटी तर विराटला…
भारतीय संघात पदार्पणासाठी आयपीएल स्टार्स सज्ज, आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---